महाराष्ट्र विचार साहित्य संसदची घोषणा; लवकरच पुरस्काराचे वितरण
Satara News : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी 'मूकनायक' वर्तमानपत्र सुरू केले या घटनेला या वर्षी १०० वर्षे होत आहेत. या शताब्दी वर्षपूर्तीनिमित्त महाराष्ट्र विचार साहित्य संसदच्या वतीने देण्यात येणारा पहिला 'मूकनायक पत्रकारिता पुरस्कार' दैनिक पुण्यनगरीचे सातारा आवृत्तीचे मोहन मारुती मस्कर - पाटील यांना जाहीर झाला आहे. पाच हजार रुपये, सन्मानचिन्ह, सन्मानपत्र आणि संविधान असे पुरस्काराचे स्वरुप आहे.
महाराष्ट्र विचार साहित्य संसदेचे अध्यक्ष अरुण जावळे व कार्याध्यक्ष चेतन शिंदे यांनी या पुरस्काराची मंगळवारी सातारा येथे घोषणा केली. मोहन मस्कर - पाटील यांनी नकुसा, एडस् या विषयापासून डॉ. नरेंद्र दाभोलकर, डॉ. आ. ह. साळुंखे यांच्या विवेकवादी, चिकित्सावादी, विज्ञानवादी साहित्य मूल्यांविषयी तसेच त्यांच्या जीवननिष्ठा, विचारदृष्टी यासह परिवर्तनवादी विषयावर लेखन केलेले आहे. त्यामुळे त्यांची या पुरस्कारासाठी एकमताने निवड करण्यात आली. लवकरच हा पुरस्कार प्रदान सोहळा पुणे अथवा सातारा येथे होणार आहे.
विविध पुरस्कारांनी कार्याचा गौरव
चिंचेवाडी (ता. शिराळा, जि. सांगली) येथील असलेले मोहन मस्कर - पाटील यांच्या नावावर एनएफआय, युनिसेफ - हर्ड, पॉप्युलशन फर्स्ट, सीएसई, रिच, अनिल अगरवाल तसेच अनेक माध्यम शिष्यवृत्ती आणि महाराष्ट्र सरकारचे पाच पुरस्कार आहेत. दरम्यान, या पुरस्काराबद्दल 'पुण्यनगरी'चे वृत्तसंपादक विनोद कुलकर्णी, जाहिरात व्यवस्थापक संतोष कदम, जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष हरीष पाटणे यांनी त्यांचे अभिनंदन केले.
Get all live and latest Marathi news, Maharashtra news and all exclusive, top marathi news headlines from politics, sports, ententertainment, business, all events from satara, all cities of Maharashtra, India.
पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता.
आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क - 7588638613

0 टिप्पण्या