Satara News : विजय मांडके यांना मूकनायक पुरस्कार प्रदान


मुंबईत विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांच्या हस्ते पुरस्काराचे वितरण

Satara News : ज्येष्ठ पत्रकार विजय मांडके यांना विधानसभेचे अध्यक्ष नाना पटोले यांच्या हस्ते मूकनायक सामाजिक पत्रकारिता पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. मुंबई येथे मुंबई मराठी पत्रकार संघाच्या सभागृहात नुकताच हा समारंभ झाला.

वर्ल्ड बुद्धिस्ट आणि आंबेडकराईट मिशन भारत आणि कल्याण तालुका जर्नालिस्ट वेल्फेअर असोसिएशनच्या वतीने मूकनायक शताब्दी सांगता सोहळा आयोजित करण्यात आला होता. या समारंभात मांडके यांच्यासह दिवाकर शेजवळ, किरण सोनवणे, वीनू वर्गिस यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यावेळी केंद्रीय समाजकल्याण राज्यमंत्री रामदास आठवले, महापौर किशोरीताई पेडणेकर, डॉ. रामप्रसाद मोरे, मुंबई मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष नरेंद्र वाबळे, कल्याण तालुका जर्नालिस्ट वेल्फेअर असोसिएशनचे अध्यक्ष प्रदीप जगताप, साहेबराव सुरवाडे हेही उपस्थित होते.

ज्योत प्रखर करण्याची गरज

भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी अन्यायी समाज व्यवस्थेविरोधात मूकनायक हे वर्तमानपत्र काढून त्या व्यवस्थेच्या विरोधात ज्योत पेटवली. ती सध्याच्या दबावतंत्राचा विरोधात अधिक प्रखर करण्याची सध्या गरज असल्याचे प्रतिपादन नाना पटोले यांनी यावेळी केले. याप्रसंगी रामदास आठवले, किशोरीताई पेडणेकर, नरेंद्र वाबळे यांनीही मनोगत व्यक्त केले.

Get all live and latest Marathi news, Maharashtra news and all exclusive, top marathi news headlines from politics, sports, ententertainment, business, all events from satara, all cities of Maharashtra, India.

आजच्या ताज्या बातम्या  

पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता.

आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क - 7588638613

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या