Satara News : गंभीर स्वरूपाचे गुन्हे असलेले पाचजण तडीपार


सातारचे जिल्हा पोलीस प्रमुख अजयकुमार बन्सल यांचा गुन्हेगार टोळीला दणका

Satara News : सातारा शहर, तालुका, शाहूपुरी व औंध परिसरात दरोडा गर्दी - मारामारी, खुनाचा प्रयत्न अशा गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल असलेल्या पाचजणांच्या टोळीला जिल्हा पोलीस प्रमुख अजयकुमार बन्सल यांनी एक वर्षासाठी जिल्ह्याच्या हद्दीतून तडीपार केले. 

आकाश संदीप साबळे (वय २३, रा. शिवथर, ता. सातारा), साहिल अय्याज इनामदार (वय २०, रा. केसरकर पेठ, सातारा), शाकीर ऊर्फ शाकिबा बाबा शेख (वय २६, रा. मल्हार पेठ), तेजस ऊर्फ भाऊ रमेश कदम (वय २६, रा. चंदननगर, कोडोली, सातारा) व रामा शिवाप्पा बनसोडे (वय ३३, रा. रविवार पेठ, सातारा) अशी तडीपार केलेल्यांची नावे आहेत. 

एक वर्षासाठी जिल्ह्याच्या हद्दीतून तडीपार

यातील आकाश साबळे हा टोळीप्रमुख असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. या पाच जणांच्या टोळीवर गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल आहेत. संशयितांवर गुन्हा दाखल झाल्यानंतर त्यांच्यावर कारवाई करुन त्यांना सुधारण्याची संधी पोलिसांनी दिली होती. मात्र त्यांच्या वर्तनात फरक पडत नव्हता. त्यामुळे त्यांना हद्दपार करण्याबाबतचा प्रस्ताव शाहूपुरी पोलिसांनी जिल्हा पोलीस प्रमुखांकडे पाठवला होता. त्यांनी सुनावणी घेऊन संशयितांच्या टोळीला एक वर्षासाठी जिल्ह्याच्या हद्दीतून तडीपार करण्याचे आदेश दिले. 

याप्रकरणी सरकारपक्षाच्यावतीने स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक किशोर धुमाळ, शाहूपुरी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल वायकर, स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक फौजदार मधुकर गुरव यांनी योग्य पुरावा सादर केला.

Get all live and latest Marathi news, Maharashtra news and all exclusive, top marathi news headlines from politics, sports, ententertainment, business, all events from satara, all cities of Maharashtra, India.

आजच्या ताज्या बातम्या  

पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता.

आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क - 7588638613

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या