Satara News : सिमेंट व स्टील भाववाढीविरोधात आंदोलन


कंपन्यांच्या मनमानीला लगाम घालण्यासाठी यंत्रणा उभी करण्याची मागणी

Satara News : सिमेंट व स्टील कंपन्यांच्या मनमानी भाववाढी विरोधात बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडियाच्या सातारा शाखेने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन केले. यावेळी मागण्यांचे निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी सुनिल थोरवे यांना देण्यात आले.

बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडिया ही संपूर्ण भारतभर इंजिनिअरिंग कॉन्ट्रॅक्टर व रियल इस्टेट क्षेत्रात काम करणार्‍या व्यावसायिकांची प्रमुख संस्था आहे. ‘बीएआय’ची देशभर दोनशेहून अधिक सेंटर्स असून २० हजार पेक्षा जास्त व्यावसायिक संस्था व १ लाखापेक्षा जास्त सदस्य संख्या आहे.  आजच्या घडीला संपूर्ण देश एका नाजूक परिस्थितीतून वाटचाल करीत असताना स्टील व सिमेंट कंपन्यांनी मनमानी करून व साठेबाजी करून कृत्रिम भाववाढ केली आहे. बांधकामात महत्वाचे असलेले स्टील आणि सिमेंट यांच्या किमतीवर कोणाचेही नियंत्रण नाही. त्यामुळे या दोन्हींच्याही किमती प्रचंड वाढलेल्या आहेत. या दोनही साहित्याची निर्मिती करणार्‍या कंपन्यांमध्ये एकजूट असल्याने त्या एकत्र येऊन मनमानी पद्धतीने दरवाढ करत आहेत. त्याचा परिणाम म्हणून बांधकाम व्यावसायिकांना व्यवसाय करणे मुष्कील होत आहे, असे या निवेदनात म्हटले आहे. 

व्यावसायिकांना आर्थिक झळ

ज्याप्रमाणे शेअर मार्वेâटवर नियंत्रण ठेवण्यासाठी सेबी या संस्थेची निर्मिती करण्यात आली, तसेच टेलिकॉम क्षेत्रासाठी ट्राय, विमा क्षेत्रासाठी आयआरडीएआय, रियल इस्टेटसाठी रेरासारखी नियामक प्राधिकरणे निर्माण करण्यात आली, त्याच धर्तीवर सिमेंट व स्टील नियंत्रण प्राधिकरण निर्माण करण्यात यावे म्हणजे साठेबाजी व कृत्रिम भाववाढ यावर नियंत्रण राखले जाईल. या भाववाढीमुळे टेंडरमध्ये भरलेल्या किमतीत बांधकाम पूर्ण करणे अशक्य होत असल्याने अनेक बांधकाम व्यावसायिकांना आर्थिक झळ बसत आहे. सामान्य लोकांना स्वत:साठी घर बांधणे आर्थिक दृष्ट्या अधिकाधिक कठीण होत आहे, असे सातारा शाखेचे अध्यक्ष श्रीराज दीक्षित यावेळी म्हणाले.

दरवाढीची उच्चस्तरीय चौकशी करा

सहा कोटीपेक्षा अधिक रोजगार निर्माण करण्याच्या योजनेपैकी दरवाढ करून अडचणीत आणणार्‍या सिमेंट व स्टीलच्या दरवाढीची उच्चस्तरीय चौकशी करून सिमेंट व स्टील कंपन्यांवर कारवाई करावी, अन्यथा परवडणारी घरे ही केवळ एक संकल्पनाच राहील, असे असोसिएशनचे सेक्रेटरी साहिल शेख म्हणाले.

या आंदोलनाला बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडिया सातारा शाखेचे पदाधिकारी, कार्यकारिणी सदस्य व सदस्य उपस्थित होते.

Get all live and latest Marathi news, Maharashtra news and all exclusive, top marathi news headlines from politics, sports, ententertainment, business, all events from satara, all cities of Maharashtra, India.

आजच्या ताज्या बातम्या  

पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता.

आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क - 7588638613

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या