सर्व अवयव सुस्थितीत; नैसर्गिकरीत्या मृत्यू झाल्याचा अंदाज
Satara News : पाटण तालुक्यातील धामणी गावाजवळील शिवारात आज दुपारी बिबट्याची मादी मृतावस्थेत आढळून आली. या बिबट्याच्या मादीच्या नख्या, दात, मिशा व कातडी सुस्थितीत असून तिचा मृत्यू नैसर्गिकरीत्या झाला असावा असा अंदाज वन विभागाच्या अधिकार्यांनी वर्तवला आहे.
सोमवारी दुपारी साडेचारच्या सुमारास धामणी (श्रीरामनगर) येथील शेतकर्याला वनक्षेत्रालगत असलेल्या ओढ्याजवळील जाळीत अडकलेला मृत बिबट्या आढळला. त्याने याबाबत त्वरित वन विभागास कळवले. पंधरा मिनिटात पाटण वन विभागाचे ढेबेवाडी भागातील अधिकारी - कर्मचारी घटनास्थळी पोहोचले व त्यांनी जाळी साफ करून त्यास बाहेर काढले. त्यानंतर त्वरित पाटणचे वनक्षेत्रपाल विलास काळे व वन्यजीव अपराध नियंत्रण ब्युरोचे सदस्य रोहन भाटे हेही घटनास्थळी पोहोचले.
बिबट्याचे शवविच्छेदन मंगळवारी
मृत बिबट्याचे वय पाच ते सहा महिने असून त्याच्या शरीराची तपासणी केली असता बिबट्याच्या नख्या, दात, मिशा व कातडी सुस्थितीत आढळली. त्यानंतर त्याची मोजमापे घेऊन वनरक्षक अमृत पन्हाळे यांनी पंचनामा नोंदवला. परंतु सायंकाळ झाल्याने बिबट्याचे शवविच्छेदन मंगळवारी करण्याचे ठरले. या सर्व तपासणीत सहाय्यक वनसंरक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली वनक्षेत्रपाल विलास काळे, रोहन भाटे, वनपाल (भोसगाव) सुभाष राऊत, वनरक्षक (सणबूर) अमृत पन्हाळे, वनरक्षक (घोटील) जयवंत बेंद्रे, वनरक्षक (काळगाव) विशाल डुबल, वनमजूर मुबारक मुल्ला तसेच अजय कुंभार यांनी तपासणीकामी सहभाग नोंदवला. धामणीचे माजी सरपंच संजय सावंत, नानासो सावंत, हणमंत कुष्टे, बाजीराव सावंत व ग्रामस्थांनी सहकार्य केले.
Get all live and latest Marathi news, Maharashtra news and all exclusive, top marathi news headlines from politics, sports, ententertainment, business, all events from satara, all cities of Maharashtra, India.
पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता.
आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क - 7588638613

0 टिप्पण्या