Satara News : आईच्या फसवणूकप्रकरणी मुलगा - सुनेविरूध्द गुन्हा


वृध्दापकाळाची सोय म्हणून बांधलेल्या घराचा संगनमताने केला परस्पर व्यवहार

Satara News : वृद्धापकाळात आधार व्हावा म्हणून आईने सेवानिवृत्तीपूर्वी आरफळ कॉलनी (कोरेगाव) येथे खरेदी केलेल्या दोन गुंठे जमिनीसह त्यावर बांधलेल्या इमारतीचे मुलाने खोटे बक्षीसपत्र करुन रेकॉर्डला स्वत:चे नाव लावून नंतर या मालमत्तेचा परस्पर व्यवहार करुन संगनमताने आईची फसवणूक केल्याप्रकरणी मुलगा व सुनेवर कोरेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. 

मोहम्मद बालेखान भालदार व यास्मिन मोहम्मद भालदार (रा. बालाजी कॉलनी, पिसवली, हाजी मलंग रोड, कल्याण पूर्व, ठाणे, हल्ली रा. शिवतक्रारवाडी, नीरा, ता. पुरंदर) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. यासंदर्भात राबिया बालेखान भालदार (रा. बालाजी कॉलनी, पिसवली, हाजी मलंग रोड, कल्याण पूर्व, ठाणे, हल्ली रा. आरफळ कॉलनी, कोरेगाव) यांनी फिर्याद दिली आहे. पोलीस नाईक सनी आवटे तपास करत आहेत.

Get all live and latest Marathi news, Maharashtra news and all exclusive, top marathi news headlines from politics, sports, ententertainment, business, all events from satara, all cities of Maharashtra, India.

आजच्या ताज्या बातम्या  

पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता.

आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क - 7588638613 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या