लोणंद पोलिसांची कामगिरी; संशयितांकडून घातक हत्यारे हस्तगत
Satara News : सातारा ते फलटण मार्गावर रात्रीच्या वेळी जॅक टाकून वाहनचालकांना लुटणारी टोळी लोणंद पोलिसांनी जेरबंद केली. या जॅक टोळीतील पाच जणांकडून लोखंडी कोयता, लाकडी दांडके, मिरची पूड, नायलॉनची दोरी, स्क्रू ड्रायव्हर, लोखंडी रॉड अशी घातक हत्यारे जप्त केली आहेत.
लोणंद पोलीस ठाणे हद्दीतील सातारा - फलटण मार्गावरील प्रसाद स्टोन क्रशरजवळील निर्जन खिंडीत काही दिवसांपासून रस्त्यावर लाल रंगाचा जॅक ठेवून त्याचे आमिष दाखवून ट्रकचालकांना लुटण्याचे प्रकार घडत होते. याबाबत माहिती मिळाल्यानंतर लोणंद पोलिसांनी याची गोपनीय माहिती काढली. त्यानुसार रात्री या रस्त्यावरील प्रसाद स्टोन क्रशर लगत जॅक व संशयित इसम आल्याची माहिती मिळाली. त्या अनुषंगाने लोणंद पोलिसांनी या ठिकाणी सापळा रचला.
थरारक पाठलाग करून पकडले
संशयितांना पोलिसांची चाहूल लागताच त्यांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी त्यांचा पाठलाग करुन अटक केली. याप्रकरणी दरोड्याच्या तयारीत असणार्या रामदास बापू काळे, पिंटू शहाजी काळे, तानाजी अशोक काळे, सचिन अशोक काळे (सर्व रा. पारा, जि. धाराशिव) यांना अटक करण्यात आली आहे. तर एका अल्पवयीन मुलाला बाल सुधार गृहात दाखल करण्यात आले आहे. संशयितांकडून कोयता, लाकडी दांडके, मिरची पूड, नायलॉनची दोरी, स्क्रु ड्रायव्हर, लोखंडी रॉड अशी घातक हत्यारे जप्त करण्यता आली आहेत.
सर्व संशयित हे ऊसतोडसाठी आले असून दिवसभर मजुरी करुन रात्री लुटमार करत होते. त्यांच्या लुटमारीमुळे वाहनचालकांमध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झाले होते. या कारवाईत सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष चौधरी, पोलीस उपनिरीक्षक गणेश माने, हवालदार महेश सपकाळ, अविनाश नलावडे, अविनाश शिंदे, गोंविंद आंधळे, संतोष नाळे, सागर धेंडे, अभिजित घनवट, केतन लाळगे, पैâय्याज शेख, अमोल पवार, ज्ञानेश्वर साबळे, नाना होले, अनिल भोसले यांनी सहभाग घेतला.
Get all live and latest Marathi news, Maharashtra news and all exclusive, top marathi news headlines from politics, sports, ententertainment, business, all events from satara, all cities of Maharashtra, India.
पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता.
आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क - 7588638613

0 टिप्पण्या