जावली तालुक्यातील दोघांविरूध्द मेढा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
Satara News : जावली तालुक्यातील आरडे येथील एका घरातील मुलीचा कोरोना अहवाल बाधित आला असल्याने तिची तपासणी करण्याबरोबरच तिच्या निकट संपर्कातील लोकांची आरटीपीसीआर चाचणी करण्यास गेलेल्या सायगाव प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकार्यांसह त्यांच्या सहकार्यांना मारण्याच्या उद्देशाने धावून जात शिवीगाळ केल्याप्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल झाला आहे.
जोतिराम नामदेव ससाणे व संजय राजाराम शिंदे अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. दि. २२ रोजी दुपारी १२.३० च्या दरम्यान सायगाव प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी अजय विजय वाडते हे त्यांच्या सहकार्यांसमवेत आरडे येथे गेले होते. तिथे एका घरातील मुलगी बाधित आली असून तिची तपासणी तसेच तिच्या संपर्कात आलेल्या हायरिस्क लोकांची आरटीपीसीआर चाचणी करण्याबाबत ते सांगत होते.
शासकीय कामात अडथळाप्रकरणी गुन्हा
त्यावेळी जोतिराम ससाणे व संजय शिंदे यांनी आमच्या घरातील लोकांची टेस्ट करायची नाही. सकाळपासून चार चार वेळा येताय, आमची मुलगी मेली तरी तुम्हाला काही एक फरक पडणार नाही असे म्हणत वाडते यांच्यासह त्यांच्या सहकार्यांच्या अंगावर मारण्याच्या उद्देशाने हे धावून जात होते. यावेळी त्यांनी शिवीगाळ केल्याने या दोघांविरुध्द मेढा पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास सहाय्यक फौजदार डी. जी. शिंदे करत आहेत.
Get all live and latest Marathi news, Maharashtra news and all exclusive, top marathi news headlines from politics, sports, ententertainment, business, all events from satara, all cities of Maharashtra, India.
पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता.
आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क - 7588638613

0 टिप्पण्या