सातारच्या सहकार, सामाजिक, साहित्य क्षेत्रातील जाणते व्यक्तिमत्त्व हरपले
Satara News : सातारा येथील प्रसिध्द किराणा व्यापारी, विविध संस्थांचे पदाधिकारी व ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते दत्ता शंकर पिलके (वय ७३) यांचे गुरूवारी सकाळी हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी, तीन मुली, एक मुलगा, नातवंडे असा मोठा परिवार आहे.
दत्ता पिलके तथा काका हे सातारा शहर किराणा व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष पंकज पिलके यांचे ते वडील, तर प्रसिध्द व्यापारी बाळ पिलके, व्यापारी पतसंस्थेचे चेअरमन दिलीप पिलके यांचे बंधू होत. त्यांचा विविध सामाजिक, सहकार क्षेत्रातील संस्थांशी निकटचा संबंध होता. वीरशैव सहकारी पतसंस्थेचे चेअरमन, सातारा डिस्ट्रिक्ट मर्चंट्स बँकेचे व्हाईस चेअरमन म्हणून त्यांनी काही काळ उत्तम कामकाज केले होते.
वीरशैव तिराळी समाज (महाराष्ट्र) या संस्थेचे ते स्थापनेपासून आजवर विश्वस्त होते. शिवाय काही वर्षे त्यांनी सरचिटणीस पदही भूषवले होते. गेल्या अनेक वर्षांपासून ते गुंफण परिवाराशी जोडले गेले होते. गोवा, कर्नाटकातील गुंफणच्या साहित्य संमेलनात ते रसिकतेने सहभागी झाले होते. त्या माध्यमातून त्यांनी सीमा लढ्यातही सहभाग घेतला होता. हसतमुख, मीतभाषी, सहकार्य वृत्तीचे असल्यामुळे त्यांच्याविषयी सर्वांनाच खूप आदर होता. त्यामुळे त्यांच्या आकस्मिक निधनाने सर्वांनाच धक्का बसला. विविध क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांच्या निधनाबद्दल तीव्र दु:ख व्यक्त केले.
Get all live and latest Marathi news, Maharashtra news and all exclusive, top marathi news headlines from politics, sports, ententertainment, business, all events from satara, all cities of Maharashtra, India.
पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता.
आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क - 7588638613

0 टिप्पण्या