सातारा येथील प्रकाराने खळबळ; दहा ते पंधरा जणांविरूध्द गुन्हा दाखल
Satara News : सातारा येथील बॉम्बे रेस्टॉरंट चौक परिसरात असलेल्या एका शोरुममध्ये वाहनाची बॅटरी बदलून आणण्यासाठी गेलेल्या एकाला मारहाण करुन लुटल्याची घटना घडली. याप्रकरणी मनजितसिंह विश्वासराव लाड (रा. कुंडल, ता. पलूस) यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन सातारा शहर पोलिसांनी विक्रम जाधव, राजेश जाधव, प्रशांत जाधव, हेमंतकुमार देसाई, विकास मोहिते, रोहन शिंदे यांच्यासह दहा ते पंधरा जणांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मनजितसिंह व त्यांचा भाऊ सुरजितसिंह हे येथील विश्व मोटर्स या दुकानात त्यांच्या वाहनाची बिघडलेली बॅटरी बदलून घेण्यासाठी गेले होते. त्यावेळी संशयितांनी त्यांना बॅटरी बदलून मिळणार नाही असे सांगितल्याने मनजितसिंह व संशयितांच्यात वाद सुरु झाला. या वादाच्या रागातून संशयितांनी त्यांना लाथा बुक्क्यांनी मारहाण केली. या मारहाणीत फिर्यादी यांचे २२ हजार रुपये व एटीएम कार्ड असलेले पाकिट संशयितांनी चोरुन नेल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक मोरे करत आहेत.
Get all live and latest Marathi news, Maharashtra news and all exclusive, top marathi news headlines from politics, sports, ententertainment, business, all events from satara, all cities of Maharashtra, India.
पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता.
आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क - 7588638613

0 टिप्पण्या