Satara News : सवतीमत्सराने केला घात; महिलेची आत्महत्या


टीव्ही आणायला पहिलीला नेली म्हणून दुसरीने लावून घेतला गळफास

Satara News : पतीने पहिल्या बायकोला टीव्ही आणायला नेल्याचा राग मनात धरुन दुसर्‍या पत्नीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा प्रकार खंडाळा तालुक्यातील कवठे गावच्या हद्दीत घडला आहे. पार्वती दगडू फुलसुरे असे आत्महत्या केलेल्या विवाहितेचे नाव आहे. या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली आहे.

दगडू नरासिंग फुलसुरे (रा. आवंडा, पो. बडूर, ता. निलंगा, जि. लातूर. सध्या रा. कवठे, ता. खंडाळा) हे मजूर असून त्यांचे दोन विवाह झाले आहेत. त्यांच्या पहिल्या पत्नीचे नाव गुणाबाई, तर दुसर्‍या पत्नीचे नाव पार्वती आहे. आपल्या घरी टीव्ही आणा अशी दुसरी पत्नी पार्वती यांची मागणी होती. दगडू घरी असताना दुसरी पत्नी पार्वती हिने खुणा करुन टीव्ही घेऊन या, असे सांगितले. यावर दगडू यांनी तू लहान मुलीला घेऊन घरीच थांब. मी आणि गुणाबाई (पहिली पत्नी) टीव्ही आणायला जातो, असे सांगितले. याचा पार्वती यांना राग आल्यामुळे भांडी, कपडे यांची आदळआपट करत तुम्ही गुणाबाईला घेऊन जाता. मला का घेऊन जात नाही? असा आक्षेप घेतला. यावेळी दगडू यांनी पार्वती यांची समजूत काढली आणि ते गुणाबाई यांना घेऊन सकाळी सव्वाआठ वाजण्याच्या सुमारास शिरवळ येथे आले.

शिरवळ पोलिसात गुन्हा दाखल

दरम्यान, दगडू आणि गुणाबाई टीव्ही आणण्यासाठी गेले. मात्र मला घेऊन गेले नाहीत याचा राग मनात धरुन सकाळी सव्वाआठ ते साडेदहा वाजण्याच्या दरम्यान राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. याची माहिती दगडू फुलसुरे यांनी शिरवळ पोलीस ठाण्यात दिल्यानंतर त्याची नोंद झाली आहे. अधिक तपास महिला पोलीस उपनिरीक्षक व्ही. ए. देसाई करत आहेत.

Get all live and latest Marathi news, Maharashtra news and all exclusive, top marathi news headlines from politics, sports, ententertainment, business, all events from satara, all cities of Maharashtra, India.

आजच्या ताज्या बातम्या  

पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता.

आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क - 7588638613

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या