Sports News : इंग्लंडविरुद्धच्या ट्वेन्टी-२० मालिकेसाठी संघ जाहीर

आयपीएल गाजवणाऱ्या युवा खेळाडूंना मिळाले संघात स्थान

Sports News : इंग्लंडविरुद्धच्या ट्वेन्टी-२० मालिकेसाठी भारताचा संघ बीसीसीआयने जाहीर केला आहे. भारतीय संघात धडाकेबाज सलामीवीर रोहित शर्माचे पुनरागमन झाले असून त्याला उपकर्णधारपद देण्यात आले आहे. तसेच अनुभवी गोलंदाज भुवनेश्वर कुमार देखील १५ महिन्यानंतर संघात पुनरागमन करत आहे. त्याचबरोबर आयपीएलचे सामने एकहाती गाजवणाऱ्या खेळाडूंच्या मेहनतीला यश मिळाले आहे.

भारत आणि इंग्लंड यांच्यामध्ये पाच ट्वेन्टी-२० सामन्यांची मालिका खेळवण्यात येणार आहे. ही मालिका १२ मार्चपासून सुरु होणार आहे. त्याचबरोबर सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे या संघात सूर्यकुमार यादव आणि राहुल तेवातिया यांना स्थान देण्यात आले आहे. भारताच्या या संघात रिषभ पंतसोबत झारखंडचा धडाकेबाज खेळाडू ईशान किशनला यष्टीरक्षक म्हणून संधी देण्यात आली आहे. 

रोहित - शिखरवर सलामीची जोखीम

भारताच्या सलामीची जबाबदारी रोहित शर्मा आणि शिखर धवन यांच्यावर असेल. त्याचबरोबर लोकेश राहुल हादेखील एक सलामीचा पर्याय उपलब्ध आहे. त्याचबरोबर मधल्या फळीची जबाबदारी कर्णधार विराट कोहली, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, हार्दिक पंड्या, रिषभ पंत आणि इशान किशन यांच्यावर असेल. संघात भारतीय संघाची वेगवान गोलंदाजीची जबाबदारी ही टी. नटराजन, भुवनेश्वर कुमार, दीपक चहर, नवदीप सैनी आणि शार्दुल ठाकूर यांच्यावर असेल. त्याचबरोबर फिरकी गोलंदाजांमध्ये युजवेंद्र चहल, वरुण चक्रवर्ती, अक्षर पटेल, वॉशिंग्टन आणि राहुल तेवातिया यांना देण्यात आली आहे.

भारताचा तिसरा कसोटी सामना २४ फेब्रुवारीपासून, तर चौथा कसोटी सामना ४ मार्चपासून सुरु होणार आहे. हे दोन्ही सामने अहमदाबाद येथे होणार आहे.

Get all live and latest Marathi news, Maharashtra news and all exclusive, top marathi news headlines from politics, sports, ententertainment, business, all events from satara, all cities of Maharashtra, India.

आजच्या ताज्या बातम्या  

पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता.

आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क - 7588638613

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या