Udayanraje News : प्रतापगड, अजिंक्यतारा ‘राष्ट्रीय स्मारक’ घोषित करा


खासदार उदयनराजे यांनी केली व्यकय्या नायडू यांच्याकडे मागणी

Udayanraje News : किल्ले अजिंक्यतारा आणि प्रतापगडाचे ऐतिहासिक महत्व लक्षात घेवून केंद्र सरकारने राष्ट्रीय स्मारक म्हणून घोषित करून या किल्ल्यांचे संवर्धन करावे, अशी मागणी खासदार उदयनराजे भोसले यांनी उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांच्याकडे केली आहे.

याआधी 'आपण स्वत: छत्रपती शिवाजी महाराज यांचा खंदा प्रशंसक आहे. तसेच देवी भवानीचा उपासक आहे' असे सांगून उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी छत्रपती शिवाजी महाराजांप्रति आदर व्यक्त केला होता. खासदार उदयनराजे यांनी त्यांची दिल्लीतील निवासस्थानी भेट घेऊन ही मागणी केली. यावेळी त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या राजमुद्रेची प्रतिकृती उपराष्ट्रपतींना सन्मानपूर्वक भेट दिली.

छत्रपती शिवाजी महाराजांनी मोठ्या पराक्रमाने आणि शौर्याने स्वराज्याची निर्मिती केली. हाच ऐतिहासिक ठेवा भावी पिढीसाठी प्रेरणादायी असून त्याच्या संवर्धनासाठी राष्ट्रीय पातळीवर प्रयत्न होणे गरजेचे आहे, असे उदयनराजे यांनी नायडू यांना सांगितले.

Get all live and latest Marathi news, Maharashtra news and all exclusive, top marathi news headlines from politics, sports, ententertainment, business, all events from satara, all cities of Maharashtra, India.

आजच्या ताज्या बातम्या  

पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता.

आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क - 7588638613

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या