‘कोरोनाचा प्रादुर्भाव पाहता खरा वारकरी देहुला तुकाराम बीजेला जाणार नाही’
Pune News : वारकरी संप्रदायात मंदिरात जावून दर्शन घेण्याची परंपरा आहे असं कोण म्हणालं ? महामारीच्या काळात गर्दी करुन, जमाव जमवून मृत्यूस कारण बनून हजारो वारकर्यांच्या जिवाशी खेळा अशी वारकरी संप्रदाय अथवा वारकरी संतांची शिकवणूकच नाही. म्हणून कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव लक्षात घेता खरा वारकरी देहुला तुकाराम बीजेला जाणार नाही. वारकरी हा प्रथम या देशाचा नागरिक आहे. नैतिकतेबरोबर तो कायद्याचे पालन करणारा आहे. म्हणूनच देहुला जायचा अट्टाहास खरा वारकरी करणार नाही, असे प्रतिपादन करणारे पत्रक गुरुवर्य भोजलिंग महाराज यांचे वंशज व कीर्तनकार ह. भ. प. ज्ञानेश्वर महाराज बंडगर, विद्रोही सांस्कृतिक चळवळ, महाराष्ट्रचे कार्याध्यक्ष व बडवे उत्पात हटाव पुस्तिकेचे लेखक कॉ. धनाजी गुरव आणि विद्रोही सांस्कृतिक चळवळीचे उपाध्यक्ष विजय मांडके यांनी प्रसिद्धीस दिले आहे.
पत्रकात म्हटले पुढे आहे, की कोरोना व्हायरसचे विषाणू सर्वत्र पसरु लागले आहेत. जगद्गुरू तुकोबाराय तर म्हणतात, 'तुका म्हणे अन्न जिरो नेदी माशी, आपुलिया जैसी संसर्गे'. जगद्गुरू तुकोबाराय संसर्गाच्या बाबतीत एवढी समाजाची काळजी घेत त्यांना प्रबोधित करतात, तर मग त्यांच्या विचारांची पायमल्ली करीत त्यांच्या विचार वाहकांनी देहूला जाण्याचा अट्टाहास का बरे करावा ? शेवटी शरीर हे एक परमार्थाचे साधन आहे. त्याला दु:ख न देता आरोग्य सांभाळत परमार्थ करणेच हिताचे आहे असे तुकोबारायांना वाटते. म्हणूनच जगद्गुरू तुकोबाराय म्हणतात, 'तुका म्हणे आम्हा, एकांताचा वास, ब्रह्मी ब्रह्मरस सेलू सदा'.
विज्ञानवादी दृष्टी असलेली समाजरचना निर्माण करण्यासाठीच खरा वारकरी संप्रदाय कार्यरत राहत आहे. ठराविक काळ आपण या विषाणूंपासून लांब राहिलात तर ते नष्ट होतात आणि त्याचा प्रादुर्भाव होत नाही, असे विज्ञानच सांगते.
Get all live and latest Marathi news, Maharashtra news and all exclusive, top marathi news headlines from politics, sports, ententertainment, business, all events from satara, all cities of Maharashtra, India.
पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता.
आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क - 7588638613

0 टिप्पण्या