Satara News : राज्याच्या अर्थसंकल्पात साताऱ्यासाठी ‘गुड न्यूज’


सातारा सैनिक स्कूलसाठी ३०० कोटींची तरतूद; शिवेंद्रराजे यांनी मानले आभार

Satara News : सातारा येथील सैनिक स्कूलच्या अंतर्गत विकास आणि अधिक सुसज्जतेसाठी भरीव निधीची गरज होती. हा प्रश्न आमदार शिवेंद्रराजे भोसले यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे सुटला आहे. राज्याच्या अर्थसंकल्पात सातारा सैनिक स्कूलसाठी ३०० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली असून याबद्दल आमदार शिवेंद्रराजे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार, शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड, पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांचे आभार मानले आहेत.

सातारा हा शूरवीरांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. या जिल्ह्याने देशसेवेसाठी हजारो सैनिक दिले आहेत. देशात काही निवडक शहरात सैनिक स्कूल आहेत. त्यामध्ये आपल्या सातारा शहराचाही समावेश आहे. सैनिकी शिक्षण देऊन देश रक्षणासाठी शूरवीर, राष्ट्रप्रेमी अधिकारी आणि सैनिक या स्कूलमधून घडवले जातात. या सैनिक स्कूलचा अंतर्गत विकास व्हावा, विद्यार्थ्यांसाठी अत्यावश्यक बाबी विकसित व्हाव्यात आणि हे सैनिक स्कूल परिपूर्णतेने सुसज्ज व्हावे यासाठी भरीव निधी उपलब्ध व्हावा यासाठी आमदार शिवेंद्रराजे यांचा पाठपुरावा सुरु होता. त्यांच्या पाठपुराव्याला मोठे यश मिळाले असून चालू अर्थसंकल्पीय अधिवेशनात सातारा सैनिक स्कूलसाठी ३०० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.

Get all live and latest Marathi news, Maharashtra news and all exclusive, top marathi news headlines from politics, sports, ententertainment, business, all events from satara, all cities of Maharashtra, India.

आजच्या ताज्या बातम्या  

पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता.

आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क - 7588638613

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या