Satara News : ‘पॅरामिलिटरी’च्या सदस्यांना सहकार्याचे आश्वासन


पालकमंत्री बाळासाहेब पाटील, खासदार श्रीनिवास पाटील यांची घेतली भेट

Satara News : सातारा जिल्हा आजी माजी पॅरामिलिटरी कल्याण संघाच्या सदस्यांनी राज्याचे सहकार व पणन मंत्री तथा सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री बाळासाहेब पाटील व खासदार श्रीनिवास पाटील यांची कराड येथे भेट घेऊन आपल्या विविध मागण्यांसंदर्भात चर्चा केली.
सदस्यांची घरपट्टी माफ व्हावी तसेच पॅरामिलिटरीच्या जवानांना अनेक सुविधा मिळत नाहीत, त्या मिळाव्यात आदी विविध विषयांवर सखोल चर्चा झाली. दोन्ही मान्यवरांनी या विषयावर सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन संघाच्या पदाधिकार्‍यांना दिले.
यावेळी माजी सैनिक संदीप सावंत तसेच संघाचे अध्यक्ष माणिकराव कदम, उपाध्यक्ष रामचंद्र पवार, सचिव सचिन शिंदे, खजिनदार रामचंद्र जाधव, सातारा तालुका अध्यक्ष सूर्यकांत कडव, जावली तालुका अध्यक्ष श्रीधर सुळके, खटाव तालुका अध्यक्ष सुरेश जाधव, कराड तालुका अध्यक्ष विजय पवार, प्रदिप घोरपडे, धनाजी बाबर, शंकर भोसले, सूरज नलवडे तसेच संघाचे सदस्य उपस्थित होते.

Get all live and latest Marathi news, Maharashtra news and all exclusive, top marathi news headlines from politics, sports, ententertainment, business, all events from satara, all cities of Maharashtra, India.

आजच्या ताज्या बातम्या  

पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता.

आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क - 7588638613

 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या