Satara News : भरती प्रक्रियेला दोन वर्षे होऊनही नियुक्तीला ठेंगा


तलाठी नियुक्तीसाठी ५ एप्रिलपासून सातार्‍यात आमरण उपोषणाचा इशारा

Satara News : तलाठी भरतीला तब्बल दोन वर्ष होऊनही जिल्ह्यातील अद्याप एकाही उत्तीर्ण उमेदवाराला नियुक्ती मिळालेली नाही. १ एप्रिलपर्यंत नियुक्त्या न दिल्यास ५ एप्रिलला जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर आमरण उपोषण करण्याचा इशारा उमेदवारांनी निवेदनाद्वारे दिला आहे.

राज्य शासनाने २०१९ मध्ये ३४ जिल्ह्यांसाठी तलाठी भरती प्रक्रिया राबवलेली होती. ३३ जिल्ह्यांनी भरती प्रक्रिया पूर्ण होऊन संबंधित उमेदवारांना वर्षभरापूर्वीच नियुक्त्या दिल्या आहेत, परंतु जिल्ह्याची भरती प्रक्रिया दोन वर्ष होऊनही अद्याप पूर्ण झालेली नाही. तलाठी पदासाठी पात्र ठरलेले उमेदवार रोज जिल्हाधिकारी कार्यालयात संपर्क करुन भरतीबाबत विचारणा करत आहेत. मात्र कार्यालयातील कर्मचारी रोज नवीन कारण देऊन निकाल लावण्यास व नियुक्त्या देण्यास टाळाटाळ करत आहेत. सर्व जिल्ह्यांतील उमेदवारांनी एकच वेळी परीक्षा देऊनही फक्त जिल्ह्यातील उमेदवारांना दोन वर्षानंतरही नियुक्ती देण्यात आलेली नाही.

जिल्हा प्रशासन गंभीर नाही 

याबाबत राज्य शासनाने वेळोवेळी परिपत्रक काढून संबंधित उमेदवारांना तत्काळ नियुक्तीचे आदेश देऊनही जिल्हा प्रशासन गंभीर नाही. या दीड - दोन वर्षांच्या दिरंगाईने उमेदवारांचे अतोनात मानसिक, आर्थिक , कौटुंबिक नुकसान झालेले आहेत. काही उमेदवारांनी तलाठी पद मिळणार या आनंदाच्या भरात आधीच्या नोकरीचा राजीनामा दिला आहे. मात्र सद्य:स्थितीत त्यांची परिस्थिती हलाखीची बनली आहे. त्यामुळे १ एप्रिलपर्यंत नियुक्त्या न झाल्यास ५ एप्रिलपासून सर्व उमेदवार आमरण उपोषणास बसतील असा इशारा उमेदवारांकडून जिल्हा प्रशासनाला देण्यात आला आहे.

Get all live and latest Marathi news, Maharashtra news and all exclusive, top marathi news headlines from politics, sports, ententertainment, business, all events from satara, all cities of Maharashtra, India.

आजच्या ताज्या बातम्या  

पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता.

आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क - 7588638613

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या