Satara News : जिल्ह्यात कोरोना लाटेचा ट्रेलर; ३०८ पॉझिटिव्ह


फलटण, सातारा, कोरेगाव, खंडाळा तालुक्यात मोठ्या रूग्णवाढीने दहशत

Satara News : सातारा जिल्ह्यात मागील चोवीस तासात कोरोनाचा कहर पहायला मिळाला असून या ट्रेलरने सर्वांना हादरा दिला आहे. मंगळवारी रात्री जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार तब्बल ३०८ नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले आहेत. तसेच काल रात्रीपासून ३ बाधितांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली आहे.

जिल्ह्यात गेल्या चोवीस तासात सर्वाधिक ८९ रूग्ण फलटण तालुक्यात आढळून आले असून त्याखालोखाल सातारा ५०, कोरेगाव ३७, खंडाळा ३१, वाई २०, कराड १८ याप्रमाणे पॉझिटिव्ह आले आहेत. सातारा, फलटण, लोणंद शहर तसेच कोरेगाव तालुक्यातील देऊर कोरोनाचे हॉटस्पॉट झाल्याने अधिक दक्ष राहण्याची गरज आहे.

कोरोना बाधित अहवालामध्ये...

सातारा तालुका : सातारा १५, शनिवार पेठ १, रविवार पेठ ३, मंगळवार पेठ २, देशमुख कॉलनी ३, यादोगोपाळ पेठ १, पंताचा गोट २, गोडोली २, शाहूनगर २, सदर बझार ७, मोळाचा ओढा १, कृष्णानगर २, संभाजीनगर १, जुनी एमआयडीसी, सातारा १, देगाव फाटा १, नागठाणे २, लिंब १, कोंढवे १, जैतापूर २.

कराड तालुका : कराड २, शनिवार पेठ १, सोमवार पेठ १, कार्वे नाका १, कोयना वसाहत १, मलकापूर २, आगाशिवनगर १, गोळेश्वर १, आटके २, तांबवे २, काले १, मसूर १, गोवारे १, पाली १.  

पाटण तालुका : पाटण १, नेरळे १, कोंजावडे १.

फलटण तालुका : फलटण ११, नारळी बाग १, लक्ष्मीनगर ५, विद्यानगर १, सगुणामातानगर १, भडकमकरनगर ३, मलटण १, कोळकी ४, आदर्की बुद्रुक १, साखरवाडी १, साठेफाटा १, विडणी ३, निंभोरे ३, पाडेगाव २, आसू १, पवारवाडी १, तुकोबाचीवाडी १, शिंदेवाडी २, सस्तेवाडी १, मटाचीवाडी १, फडतरवाडी १, तरडगाव १८, मालेवाडी ४, सांगवी ११, निंबळक २, कांबळेश्वर ५, सरडे २, गुणवरे १.

खटाव तालुका : पुसेगाव २, अनपटवाडी २, बुध १, शिंदेवाडी ३, डिस्कळ १, दरुज २.  

माण तालुका : पळशी १, पिंगळी २, बनगरवाडी १, इंजबाव ३, म्हसवड २, बिदाल १, किरकल १.

कोरेगाव तालुका : कोरेगाव ३, पिंपरी १, कुमठे फाटा ३, करंजखोप १, जळगाव १, देऊर १०, पळशी १, सातारारोड १, वाठार स्टेशन ६, पिंपोडे बुद्रुक ३, जरेवाडी २, शिरढोण १, भाखरवाडी १, रहिमतपूर २, बोरीव १.

खंडाळा तालुका : शिरवळ ६, मिरजे  ६, लोणंद ९, खंडाळा ५, बावडा १, अहिरे १, घाटदरे १,  सांगवी २.  

वाई तालुका : वाई २, रविवार पेठ १, सिद्धनाथवाडी ४, धावडी गावठाण १, पसरणी ४, वेळे १, पाचवड १, जांभ २, देगाव १, कवठे १, मयुरेश्वर १, शेंदुरजणे १.

महाबळेश्वर तालुका : महाबळेश्वर २, पाचगणी १.  

जावली तालुका : कुडाळ २, जावली १, बामणोली १.

जिल्ह्यात ३ बाधितांचा मृत्यू

जिल्ह्यातील विविध खासगी रूग्णालयांमध्ये मार्डी (ता. माण) येथील ७३ वर्षीय पुरुष, भोसलेवाडी (ता. कराड) येथील ७५ वर्षीय महिला व घोगाव (ता. कराड) येथील ७५ वर्षीय महिला अशा एकूण ३ बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.

सातारा जिल्हा कोरोना

  • एकूण नमुने - ३७५०४७
  • एकूण बाधित - ६१३३२  
  • घरी सोडण्यात आलेले - ५७४५७  
  • मृत्यू - १८७७
  • उपचारार्थ रुग्ण - १९९८

Get all live and latest Marathi news, Maharashtra news and all exclusive, top marathi news headlines from politics, sports, ententertainment, business, all events from satara, all cities of Maharashtra, India.

आजच्या ताज्या बातम्या  

पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता.

आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क - 7588638613

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या