Satara News : सातारा जिल्हा बँकेला विशेष सन्मानपत्र


कर्ज वितरणासाठी दिलेल्या उद्दिष्टापेक्षा वाढीव उद्दिष्ट साध्य केल्याबद्दल गौरव

Satara News : सातारा जिल्ह्याच्या वार्षिक पत आराखड्यामध्ये कर्ज वितरणासाठी सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला देण्यात आलेल्या उद्दिष्टापेक्षा वाढीव उद्दिष्ट साध्य केल्याने व जिल्ह्यामध्ये कर्ज वितरणात अग्रेसर असल्याने जिल्हास्तरीय बँकर्स सभेमध्ये जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी बँकेला सन्मानपत्र देऊन सन्मानित केले. 

दरवर्षी जिल्ह्याच्या वार्षिक पत आराखड्यामध्ये एकूण उद्दिष्टाच्या ६० टक्के वाटा जिल्हा बँकेचा असतो. वार्षिक पत आराखड्यामध्ये जिल्हा बँकेचा खरीप व रब्बी पीक कर्ज वाटपाचे १३०० कोटीचे उद्दिष्ट देण्यात आले होते. यामध्ये खरीप पिकासाठी ९५० कोटीच्या उद्दिष्टापैकी बँकेने १२९५ कोटीचे वाटप करून १३६ टक्के पूर्तता केली आहे. रब्बीच्या ३५० कोटी उद्दिष्टापैकी आजअखेर २७१ कोटी वाटप केले असून रब्बीचेही वाटप उद्दिष्टाहून अधिक करण्यासाठी बँक प्रयत्नशील आहे. पीक कर्जाच्या जिल्ह्याच्या एकूण २२०० कोटीच्या उद्दिष्टाच्या पूर्ततेत बँकेचा वाटा ७० टक्केहून अधिक राहिलेला आहे. जिल्ह्याच्या एकूण उद्दिष्टामध्ये ६० टक्के उद्दिष्ट जिल्हा बँकेस दिले जाते, त्याची पूर्तता गेली अनेक वर्षे बँकेकडून केली जात आहे.

जिल्ह्याच्या विकासात बँकेचे मोठे योगदान  

सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक ही जिल्ह्याची अर्थवाहिनी असून जिल्ह्यातील शेतकरी, नोकरदार, व्यावसायिक व उद्योजक यांना पत पुरवठा करून जिल्ह्याचा विकासामध्ये मोठे योगदान देत असल्याचे उद्गार जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी यावेळी काढले. सातारा जिल्हा बँकेचे अध्यक्ष आमदार शिवेंद्रराजे भोसले, उपाध्यक्ष सुनील माने, ज्येष्ठ मार्गदर्शक व संचालक तसेच विधानपरिषदेचे सभापती रामराजे नाईक - निंबाळकर, सर्व संचालक मंडळ यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा बँक जिल्ह्याचे शेती व शेतकर्‍यांच्या विकासासाठी कटिबद्ध असून सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून कार्यरत आहे. सभेमध्ये रिझर्व्ह बँकेचे अधिकारी, जिल्हा अग्रणी बँकेचे झोनल अधिकारी, जिल्हा अग्रणी व्यवस्थापक, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी व जिल्ह्यातील सर्व इतर बँकांचे अधिकारी व प्रतिनिधी उपस्थित होते.

Get all live and latest Marathi news, Maharashtra news and all exclusive, top marathi news headlines from politics, sports, ententertainment, business, all events from satara, all cities of Maharashtra, India.

आजच्या ताज्या बातम्या  

पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता.

आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क - 7588638613

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या