Satara News : डॉ. संजोग कदम यांना उपसंचालकपदी पदोन्नती


सातारकरांना आपुलकीची सेवा देणार्‍या डॉ. कदम यांच्याकडे पुणे परिमंडलाची जबाबदारी
 

Satara News : जिल्हा शासकीय रुग्णालयातील ज्येष्ठ ऑर्थोपेडिक तज्ञ डॉ. संजोग सीताराम कदम यांना पुणे परिमंडळ आरोग्य सेवा विभागाच्या उपसंचालकपदी पदोन्नती मिळाली आहे. त्यांच्या अखत्यारित पुणे, सातारा, सोलापूर हे तीन जिल्हे असणार आहेत.

डॉ. संजोग कदम हे मूळचे सातार्‍याचे आहेत. ते १९८८ पासून वर्ग २ अस्थिरोग विभागात वैद्यकीय अधिकारी म्हणून काम पहात आहेत. पदोन्नतीने १९९९ रोजी अस्थिरोग तज्ञ वर्ग १ या पदावर जिल्हा रुग्णालयात पदोन्नती झाली. गेली २२ वर्षे ऑर्थोपेडिक सर्जन म्हणून वर्ग १ या पदावर ते कार्यरत आहेत. त्यांना आरोग्य सेवेचा ३३ वर्षाचा अनुभव आहे. त्यांनी जिल्हा रुग्णालयात गुंतागुंतीच्या शस्त्रक्रिया केल्या आहेत.

जिल्हा रूग्णालयासाठी उपकारक ठरणार !

गतवर्षी त्यांना जिल्हा शल्य चिकित्सक म्हणून काम करण्याची तीन महिने संधी मिळाली होती. राज्य शासनाने त्यांची पुणे येथे उपसंचालक म्हणून पदोन्नती केली. त्यांनी नुकताच पदभार स्वीकारला असून त्यांच्या पदोन्नतीमुळे आता जिल्हा शासकीय रुग्णालयातील रखडलेली कामे मार्गी लागणार आहेत. त्याचबरोबर चतुर्थ श्रेणीतील कर्मचार्‍यांच्या पदोन्नती व इतर प्रश्न सोडवण्यावर भर देणार असल्याचे डॉ. कदम यांनी सांगितले. पदोन्नतीबद्दल विविध क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन केले.

Get all live and latest Marathi news, Maharashtra news and all exclusive, top marathi news headlines from politics, sports, ententertainment, business, all events from satara, all cities of Maharashtra, India.

आजच्या ताज्या बातम्या  

पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता.

आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क - 7588638613

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या