Satara News : अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी गुन्हा नोंद


‘परिणाम वाईट होतील, घरच्यांनाही सोडणार नाही’ अशी धमकी देत गैरवर्तन
 

Satara News : सातारा शहर परिसरात राहणार्‍या अल्पवयीन मुलीचा विनयभंग झाल्याची घटना घडली असून एकावर गुन्हा नोंद झाला आहे. पीडित मुलगी पंधरा वर्षीय आहे. याप्रकरणी पीडित मुलीने सातारा शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर मोहम्मद शब्बीर शेख (रा. धनगरवाडी, कोडोली, सातारा) याच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.

मोहम्मद शब्बीर शेख हा पीडित युवतीकडे सातत्याने एकटक बघायचा. रस्त्याने जात असताना तिला रस्त्यात अडवून 'तू माझ्याशी पाच मिनिटे बोल' असे म्हणत त्याने तिचा पाठलाग केला होता. दरम्यान, तू माझ्याशी बोलली नाहीस तर त्याचे परिणाम वाईट होतील आणि मी तुझ्या घरच्यांना सोडणार नाही, अशी धमकीही त्याने यावेळी दिली. मोहम्मद याने एवढ्यावरच न थांबता तिच्या हाताला पकडून तिला एका चायनीज दुकानात ओढत नेले आणि तिच्या मनास लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केले.

Get all live and latest Marathi news, Maharashtra news and all exclusive, top marathi news headlines from politics, sports, ententertainment, business, all events from satara, all cities of Maharashtra, India.

आजच्या ताज्या बातम्या  

पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता.

आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क - 7588638613

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या