कोरेगाव, विहे, सर्कलवाडी, लोणंदमध्ये कोरोनाचा कहर; जिल्ह्यात १५० पॉझिटिव्ह
Satara News : सातारा जिल्ह्यात शनिवारी रात्री जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार १५० नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली.
सातारा, कोरेगाव, काही प्रमाणात कराड तालुक्यांमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला आहे. विशेषत: कोरेगाव, सर्कलवाडी, पाटण तालुक्यातील विहे, कराड शहर, लोणंदमध्ये चिंता वाटावी अशी परिस्थिती आहे. कोरोनाने पुन्हा डोके वर काढल्याने लोकांना आजारापेक्षा लॉकडाऊनच्या चिंतेने ग्रासलेले दिसत आहे.
कोरोना बाधित अहवालामध्ये...
सातारा तालुका : सातारा १, मंगळवार पेठ १, शनिवार पेठ १, केसरकर पेठ १, शिवम कॉलनी १, दौलतनगर ३, गोडोली १, शाहूपुरी १, तामजाईनगर १, समर्थनगर २, संभाजीनगर १, कोडोली २, पोगरवाडी ४, करंडी १, सांबरवाडी १, अंबेदरे १, तासगाव १, वडुथ १.
कराड तालुका : कराड ३, शनिवार पेठ ५, सैदापूर २, बनवडी १, उंब्रज १, काले २, इंदोली १, बेलवडे २.
पाटण तालुका : विहे १४.
फलटण तालुका : कसबा पेठ १, रविवार पेठ १, विद्यानगर १, शिंदेनगर १, बीबी २, तरडगाव ४, काळज २.
खटाव तालुका : वडूज ३, अनपटवाडी १, बुध ४, राजापूर १, कळंबी १, निढळ ३, शिंदेवाडी १.
माण तालुका : म्हसवड १, मलवडी १, मार्डी २, देवापूर १, सातरेवाडी १.
कोरेगाव तालुका : कोरेगाव १०, दुघी १, कुमठे १, शिरंबे १, वाठार स्टेशन १, सर्कलवाडी ९, देऊर ४, वाठार किरोली १, अरबवाडी २.
खंडाळा तालुका : लोणंद ६, नीरा १, पाडेगाव १.
वाई तालुका : वाई २, मधली आळी १, धर्मपुरी १, दत्तनगर २, बावधन १, पाचवड १, कानुर १, देगाव १, सुलतानपूर १.
महाबळेश्वर तालुका : महाबळेश्वर ४, पाचगणी १.
जावली तालुका : बामणोली १.
सातारा जिल्हा कोरोना
- एकूण नमुने - ३७०३४६
- एकूण बाधित - ६०७३१
- घरी सोडण्यात आलेले - ५७०६६
- मृत्यू - १८७१
- उपचारार्थ रुग्ण - १७९४
Get all live and latest Marathi news, Maharashtra news and all exclusive, top marathi news headlines from politics, sports, ententertainment, business, all events from satara, all cities of Maharashtra, India.
पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता.
आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क - 7588638613

0 टिप्पण्या