Satara News : पाण्यातल्या इरूळ्याने अधिवास हलवला ?


रहिमतपूर येथील शिवारात पाण्यापासून दूर आढळली इरूळ्याची अंडी

Satara News : कोरेगाव तालुक्यातील रहिमतपूर येथे लक्ष्मण माने यांच्या शेतामध्ये गंज लावत असताना सापाची अंडी दिसली. माने यांनी वन्यजीव संरक्षक आकाश राऊत यांना याविषयी माहिती दिली. दरम्यान, राऊत यांनी जागेवर जावून पाहणी केली असता दिवड या सापाची अंडी चक्क पाण्यापासून बर्‍याच दूरवर आढळून आल्याचे निदर्शनास आले. 

आकाश राऊत, सोबत त्यांचे मित्र निलेश गाडे यांनी वनरक्षक नवनाथ कोळेकर यांना याबाबतची माहिती दिली. सामान्यपणे दिवड हा पाणथळी वास्तव्यास असणारा साप असून तो त्याची अंडीदेखील त्याच ठिकाणी वा आसपास असणार्‍या कपारीमध्ये घालत असतो. परंतु पाण्यापासून बर्‍याच दूर असलेल्या माने यांच्या शेतामध्ये दिवडने अंडी घातल्याचे निदर्शनास आले. आकाश राऊत यांनी दूरध्वनीवरून ज्येष्ठ वन्यजीव रक्षक राजेंद्र परदेशी (पुणे) यांच्याशी संपर्क साधला. त्यांच्या मार्गदर्शनाखाली आणि नवनाथ कोळेकर यांच्या सहाय्याने राऊत यांनी दिवड सापास त्याच्या मूळ अधिवासात सोडले आहे.

पाण्याबाहेरचा अधिवास ही दुर्मिळ घटना

वन्यजीव  रक्षक, सर्प अभ्यासक यांच्या मते ग्रामीण भाषेत इरुळा या नावाने ओळख असणार्‍या दिवडचा पाण्याबाहेरचा अधिवास ही दुर्मिळ घटना आहे. सामान्यत: पाण्यातच, रात्री कपारीत काठावर राहणारा इरुळा शेतात कसा? विहिरी, नदी, ओढे येथील पाण्यात वास्तव्यास असणारा विरोळा बिनविषारी असल्याने भीती वाटत नाही. परंतु बदलता अधिवास, बदलती प्राण्याची जीवनशैली हे मानवाचा हस्तक्षेप, वातावरणातील वाढलेले तापमान, जलप्रदूषण यामुळे निसर्गचक्र बदलत असल्याची चिंता अभ्यासकांनी व्यक्त केली. पाण्यात राहणारा उपद्रवी नसणारा (दिवड)  इरुळ्या या सापाच्या जातीत उत्क्रांती होत असून विषारी दात यायला सुरुवात झाली असून कित्येक वर्षांनी विषारी सर्पात गणना होईल असे सर्प अभ्यासकांना वाटते.

Get all live and latest Marathi news, Maharashtra news and all exclusive, top marathi news headlines from politics, sports, ententertainment, business, all events from satara, all cities of Maharashtra, India.

आजच्या ताज्या बातम्या  

पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता.

आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क - 7588638613

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या