कोरेगावातील प्रकार; गुटखा प्रकरणात मदत करण्यासाठी मागितली होती लाच
Satara News : गुटख्याच्या प्रकरणात तसेच जामिनावर सोडण्याकरिता मदत करण्यासाठी २० हजार रूपयांची लाच घेताना कोरेगाव पोलीस ठाण्यातील सहाय्यक पोलीस उपनिरीक्षकास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने सापळा रचून रंगेहात पकडले.
संबंधित तक्रारदाराच्या भावावर गुटख्याची केस दाखल होती. त्या प्रकरणात तसेच जामिनावर सोडण्यासाठी मदत करतो म्हणून सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक प्रल्हाद श्रीरंग पाटोळे याने २० हजारांची लाच मागितली होती. याबाबतची तक्रार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे दाखल झाल्यानंतर आज या विभागाच्या वतीने सापळा रचून पाटोळे याला लाच स्वीकारताना रंगेहात पकडण्यात आले.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या या सापळा कारवाईत पोलीस निरीक्षक आरिफा मुल्ला, अविनाश जगताप, पोलीस नाईक राजे, ताटे, खरात यांनी सहभाग घेतला होता. या पथकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक राजेश बनसोडे, अपर पोलीस अधीक्षक सूरज गुरव, सुहास नाडगौडा यांचे मार्गदर्शन लाभले.
Get all live and latest Marathi news, Maharashtra news and all exclusive, top marathi news headlines from politics, sports, ententertainment, business, all events from satara, all cities of Maharashtra, India.
पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता.
आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क - 7588638613

0 टिप्पण्या