Satara News : जिल्हाधिकारी कार्यालयासमोर रिक्षाचालकांचे आंदोलन


लॉकडाऊनमुळे अडचणीत आलेल्या रिक्षाचालकांना दिलासा देण्याची मागणी

Satara News : कोरोना व लॉकडाऊनमुळे रिक्षा व्यावसायिक अडचणीत असून केंद्र व राज्य सरकारने या अडचणीत भर घालणारे धोरण अवलंबले आहे. या धोरणाचा पुनर्विचार करण्याच्या मागणीसाठी अखिल महाराष्ट्र कामगार, कर्मचारी संघाच्या वतीने रिक्षाचालकांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन केले.

याबाबतच्या निवेदनाच्या प्रती आंदोलक रिक्षाचालकांनी केंद्रीय परिवहनमंत्री नितीन गडकरी आणि जिल्हाधिकारी कार्यालयास दिल्या आहेत. या निवेदनात रिक्षाच्या नोंदणी शुल्कात वाढ न करण्याची, नोंदणी तसेच फिटनेस शुल्काची आकारणी पूर्वीच्या पध्दतीने करण्याची, नोंदणीस विलंब झाल्यास प्रतिदिन आकारण्यात येणारा ५० रुपयांचा दंड मागे घेण्याची, रिक्षांसाठी स्वतंत्र विमा गट करण्याची मागणी करण्यात आली आहे.

अनेकांचे बँक हप्ते थकले

लॉकडाऊन व त्यानंतरच्या काळातील निर्बंधामुळे रिक्षा व्यवसाय अडचणीत आला असून हा व्यवसाय करणारे सर्वच सर्वसामान्य घरातील आहेत. मध्यंतरीच्या काळातील निर्बंधामुळे अनेकांचे बँक हप्ते थकले असून त्याचा विचार करण्याची मागणीही निवेदनात करण्यात आली आहे. या आंदोलनात संघटनेचे जिल्हाध्यक्ष चंद्रकांत खंडाईत, शशिकांत खरात, गणेश भिसे, संदीप कांबळे तसेच इतर रिक्षाचालक सहभागी झाले होते.

Get all live and latest Marathi news, Maharashtra news and all exclusive, top marathi news headlines from politics, sports, ententertainment, business, all events from satara, all cities of Maharashtra, India.

आजच्या ताज्या बातम्या  

पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता.

आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क - 7588638613

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या