Satara News : सातारच्या सेव्हन स्टारमधील ७ व्यापार्‍यांना दंड


सातारा नगरपालिकेच्या पथकाची विनामास्कप्रकरणी कारवाईची मोहीम

Satara News : सातारा शहरात कोरोना संसर्ग वाढू नये यासाठी नगरपालिका प्रशासनाकडून विविध उपाययोजना केल्या जात आहेत. जिल्हाधिकार्‍यांनी लॉकडाऊनसंदर्भात जारी केलेल्या आदेशाचे उल्लंघन केले जात असल्याचे निदर्शनास आल्याने नगरपालिकेने सेव्हन स्टार व्यापारी संकुलातील ७ दुकानदारांना विना मास्कप्रकरणी साडेतीन हजार रुपयांचा दंड केला. 

लॉकडाऊन शिथिल करताना जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी अटी शर्ती घालून दिल्या आहेत. मात्र सातारा शहरातील काही दुकानदार, व्यापार्‍यांकडून नियमांचे उल्लंघन केले जात असल्याचे निदर्शनास येत आहे. त्यामुळे मुख्याधिकारी अभिजित बापट यांच्या मार्गदर्शनाखाली सातारा नगरपालिकेच्या पथकाने बाजारपेठांमध्ये कारवाई सुरु केली आहे. सेव्हन स्टार व्यापारी संकुलातील ७ दुकानदारांना विना मास्कप्रकरणी प्रत्येकी ५०० रुपयांप्रमाणे दंड करण्यात आला आहे. त्यामध्ये ब्ल्यू डायमंड मोबाईल शॉपी, राजवाडा भेळ, रोल्स मोनिया, न्यू अंबिका मोबाईल, शाओमी मोबाईल, विवो मोबाईल, संत ज्ञानेश्वर मल्टिस्टेट को - ऑपरेटिव्ह सोसायटी याठिकाणी पथकाने दंडात्मक कारवाई केली आहे.

वेळ न पाळणार्‍यांनाही बसणार दणका

काही दुकाने, हॉटेल्स, आस्थापना ठरवून दिलेल्या वेळेपेक्षा जास्त वेळ सुरु ठेवल्या जात असल्याचे निदर्शनास आले आहे. याठिकाणीही कारवाई करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. मुख्याधिकारी अभिजित बापट यांच्या मार्गदर्शनाखाली कोरोना कक्षप्रमुख प्रणव पवार, प्रशांत निकम यांच्या पथकाने ही कारवाई केली.

Get all live and latest Marathi news, Maharashtra news and all exclusive, top marathi news headlines from politics, sports, ententertainment, business, all events from satara, all cities of Maharashtra, India.

आजच्या ताज्या बातम्या  

पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता.

आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क - 7588638613

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या