शिवसेनेने आवाज उठवल्यानंतर थांबलेल्या चोरीच्या घटनांना पुन्हा सुरूवात
Satara News : फलटण तालुक्यातील डीपी चोरीच्या वाढत्या घटनांबाबत शिवसेनेच्या वतीने आवाज उठवल्यानंतर तालुक्यात एकाही डीपीची चोरी झाली नव्हती. पण ३८ दिवसांनंतर एक डीपी चोरीला गेला असल्याची माहिती मिळाली आहे.
महावितरणने मागील चार वर्षात एकूण १९० डीपी चोरीच्या फिर्यादी फलटण पोलीस ठाण्यात दाखल केल्या आहेत. पैकी एकाही चोरीचा शोध न लागला नाही. परिणामी सातत्याने डीपी चोर्या सुरूच होत्या. याबाबत शिवसेना फलटण तालुकाप्रमुख प्रदीप झणझणे यांनी जिल्हाधिकार्यांना डीपी चोरीच्या घटनांबाबत निवेदन दिले होते. त्यावरून जिल्हाधिकारी यांनी जिल्हा पोलीस प्रमुखांना डीपी चोर्यांचा शोध लावण्याबाबत आदेश दिला होता. आश्चर्य म्हणजे त्यानंतर ३८ दिवसात एकही डीपी चोरीला गेला नव्हता. मात्र आता फलटण तालुक्यातील विडणी येथील डीपी चोरीला गेला असल्याची माहिती पुढे आली आहे.
चोरीच्या घटनांचा छडा लावा
दरम्यानच्या ३८ दिवसात शेतकरी व वीज महावितरण दोघांनाही मोठा दिलासा मिळाला होता. परंतु फलटण तालुक्यात डीपी चोरी पुन्हा डोके वर काढू लागली आहे. फलटण तालुका पोलीस प्रशासनाने डीपी चोरी उघडकीस आणून चोरट्यांना शासन करावे, अशी मागणी तालुक्यातील शेतकरी व शिवसेनेच्यावतीने तालुकाप्रमुख झणझणे यांनी केली आहे.
Get all live and latest Marathi news, Maharashtra news and all exclusive, top marathi news headlines from politics, sports, ententertainment, business, all events from satara, all cities of Maharashtra, India.
पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता.
आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क - 7588638613

0 टिप्पण्या