Satara News : कराड - पाटण शिक्षक सोसायटीने रचला इतिहास


चेअरमन - व्हाईस चेअरमन पदावर प्रथमच महिलांना संधी; कराडमध्ये यथोचित सत्कार

Satara News : कराड - पाटण शिक्षक सोसायटीच्या इतिहासात पहिल्यांदाच सोसायटीच्या चेअरमन - व्हाईस चेअरमन पदावर महिलांची निवड झाली आहे. चेअरमनपदाचा पहिला मान मंगल खंडागळे यांना मिळाला आहे. या ऐतिहासिक घटनेचे औचित्य साधून एज्युकेशन इंटरनॅशनल जागतिक शिक्षक महासंघाची सलग्न अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक संघ कराड तालुक्याच्या वतीने नूतन पदाधिकारी तसेच गुणवंत शिक्षक, त्यांचे पाल्य यांचा सत्कार करण्यात आला.

अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक संघ आचार्य दोंदे या संघटनेचे शिक्षक नेते गणेश जाधव यांच्या संकल्पनेतून संघटनेचे कराड तालुका अध्यक्ष संतोष यादव, जिल्हा उपाध्यक्ष कृष्णत हिरवळे, कराड उत्तरचे अध्यक्ष निरंजन सावंत यांच्या नियोजनाने आयोजित केलेल्या या सोहळ्यात संघटनेचे नवनिर्वाचित जिल्हाध्यक्ष संजीवन जगदाळे, लोकसाहित्याच्या अभ्यासक व प्राथमिक शिक्षिका स्वाती चेणगे - बाजारे, नवनिर्वाचित कराड तालुका कार्याध्यक्ष अनिल तुपे, महाराष्ट्र इलेक्ट्रिसिटी बोर्ड उपअभियंता म्हणून निवड झालेल्या स्व. रामराव पाटील यांच्या कन्या राजकुमारी पाटील व सेवानिवृत्त मुख्याध्यापिका कल्पना साळुंखे यांचाही यथोचित सत्कार करण्यात आला. तसेच कोरेगाव तालुका अध्यक्ष विजय भुजबळ यांना झेडपी लाइव्ह एज्युकेशन राज्यस्तरीय शिक्षक गौरव पुरस्कार प्राप्त झाल्याने त्यांचाही सत्कार करण्यात आला. शिक्षक सोसायटीच्या पद्मभूषण डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील सभागृहात हा कार्यक्रम झाला. याप्रसंगी संचालक राजेंद्र पाटील, सुनील पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.

शिक्षकांचे प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्नशील

जिल्हा उपाध्यक्ष श्रीकृष्णत हिरवळे यांनी आपल्या मनोगतात संघटनेची पार्श्वभूमी गौरवशाली वाटचाल कशी झाली याची माहिती सांगितली. राज्यस्तरीय व केंद्र स्तरावरील शिक्षकांचे सर्व प्रश्न आपली संघटना सोडवत असते, असे सांगितले. पदवीधर शिक्षक संघटनेचे बाळासाहेब पाटील यांनी कोरोना काळात घ्यावयाची काळजी, शिक्षण, शिक्षक, विद्यार्थी याविषयी मार्गदर्शन केले. दरम्यान, कार्यक्रमात तात्यासो सावंत (माजी अध्यक्ष), सूर्यकांत बाजारे यांनी उपस्थिती लावून शिक्षक हिताच्या कार्यक्रमास पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा दिल्या.

कार्यक्रमास दिनकर कारंडे, संजय सावंत, अरुणा यादव, थोरात मॅडम, रंजना पाटील यांच्यासह बहुसंख्य शिक्षक सभासद उपस्थित होते. प्रारंभी राष्ट्रपुरुषांच्या प्रतिमांना अभिवादन करण्यात आले. तसेच कोरोना महामारीत निधन पावलेल्या शिक्षक, शिक्षकांचे आई / वडील / बंधू यांना विनम्र आदरांजली वाहण्यात आली.उपस्थितांचे स्वागत संतोष यादव यांनी केले. प्रास्ताविक व सूत्रसंचालन गणेश जाधव यांनी केले. आभार निरंजन सावंत यांनी मानले.

Get all live and latest Marathi news, Maharashtra news and all exclusive, top marathi news headlines from politics, sports, ententertainment, business, all events from satara, all cities of Maharashtra, India.

आजच्या ताज्या बातम्या  

पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता.

आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क - 7588638613

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या