रेणावळे जि. प. शाळेच्या मुख्याध्यापक, शिक्षिकेस वाई न्यायालयाकडून शिक्षा
Forest News : वाई तालुक्यातील रेणावळे परिसरात वणवा लावल्याप्रकरणी दोषी धरून वाई न्यायालयाने रेणावळे येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक व शिक्षिकेस प्रत्येकी पाच हजार रूपये दंड व दंड न भरल्यास २० दिवसांची साधी वैâद अशी शिक्षा सुनावली.
याबाबतचे वृत्त असे, की रणावळे येथील शाळेचे मुख्याध्यापक शिवाजी लक्ष्मण पारटे (रा. वेलंग) व शिक्षिका नीलिमा गणेश खरात (हल्ली रा. रेणावळे) यांनी २६ फेब्रुवारी २०२१ रोजी शाळेच्या परिसरात कचरा व कागद जाळण्यासाठी आग लावली. त्यातील कागद व पालापाचोळा वार्याने उडून लगतच्या मालकी क्षेत्रात जावून तेथील मोठ्या प्रमाणात असलेल्या गवताने पेट घेतला. ही आग पसरत जावून राखीव वनक्षेत्रात वणवा लागला. वनाधिकारी व वन कर्मचारी यांनी वेळीच दक्षता घेऊन भरउन्हात हा वणवा विझवला. या वणव्यामध्ये २२ हेक्टर वनक्षेत्राचे नुकसान झाले.
न्यायालयात गुन्ह्याची कबुली
याप्रकरणी शिवाजी पारटे व नीलिमा खरात यांच्यावर वनगुन्हा नोंद करण्यात आला होता. उपवनसंरक्षक भारतसिंग हाडा, सहाय्यक वनसंरक्षक (वनीकरण) गोसावी, वनपरिक्षेत्र अधिकारी महेश झांजुर्णे यांच्या मार्गदर्शनाखाली तत्कालिन वनपाल (वाशिवली) भाऊसाहेब कदम, प्रभारी वनपाल रत्नकांत शिंदे यांनी वनरक्षक संदीप पवार, प्रदीप जोशी यांच्या मदतीने या गुन्ह्याचा तपास पूर्ण करून आरोपींविरूध्द १३ मार्च रोजी वाई न्यायालयात आरोपपत्र दाखल केले होते. दि. २० रोजी दोन्ही आरोपींनी न्यायालयासमोर गुन्हे कबूल केले. त्यानंतर न्यायालयाने त्यांना उपरोक्त शिक्षा सुनावली.
Get all live and latest Marathi news, Maharashtra news and all exclusive, top marathi news headlines from politics, sports, ententertainment, business, all events from satara, all cities of Maharashtra, India.
पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता.
आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क - 7588638613

0 टिप्पण्या