Satara News : मसूरचे माजी सरपंच संपतराव बर्गे कालवश


शेतकरी कामगार पक्षाचे जुन्या पिढीतील निष्ठावंत पाईक काळाच्या पडद्याआड

Satara News : कराड तालुक्यातील मसूर गावचे माजी सरपंच, शेतकरी कामगार पक्षाचे निष्ठावंत कार्यकर्ते संपतराव अंतोबा बर्गे (वय ८५) यांचे शुक्रवारी (दि. २६) वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या पश्चात दोन भाऊ, दोन मुले, तीन मुली, सुना व नातवंडे असा परिवार आहे.

संपतराव बर्गे हे मसूर पंचक्रोशीत बापू या नावाने ओळखले जात. ज्या काळात सर्वत्र शेतकरी कामगार पक्षाचा दबदबा होता, त्यावेळी संपतराव बापू शेकापचे मसूर भागातील प्रमुख कार्यकर्त्यांपैकी एक म्हणून सर्वांना परिचित होते. कराड उत्तरचे शेकापचे माजी आमदार केशवराव पवार यांचे ते निकटवर्तीय होते. मसूरचे सरपंचपद त्यांनी भूषवले होते. तसेच मसूर नंबर १ विकास सेवा सोसायटीचे ते वीस वर्षे चेअरमन होते. त्यांच्या निधनाने हळहळ व्यक्त होत आहे. रक्षाविसर्जन विधी रविवार दि. २८ रोजी मसूर येथे होणार आहे.

Get all live and latest Marathi news, Maharashtra news and all exclusive, top marathi news headlines from politics, sports, ententertainment, business, all events from satara, all cities of Maharashtra, India.

आजच्या ताज्या बातम्या  

पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता.

आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क - 7588638613

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या