हरियाणामध्ये लवकरच ‘हॉकी सब ज्युनियर नॅशनल चॅम्पियनशिप’चे आयोजन
Satara News : हरियाणामध्ये लवकरच होणार असलेल्या हॉकी सब ज्युनियर नॅशनल चॅम्पियनशिप २०२१ या स्पर्धेसाठी सातारा येथील के. एस. डी. शानभाग विद्यालय आणि जुनियर कॉलेजची विद्यार्थिनी निकिता देशमुख हिची निवड झाली आहे.
निकिता सध्या इयत्ता दहावीत शिकत असूनही या स्पर्धेसाठी कठोर परिश्रम घेत आहे. तिला सागर कारंडे हे शिक्षक प्रशिक्षण देत आहेत. आत्तापर्यंत शानभाग विद्यालयाच्या अनेक खेळाडूंनी विविध खेळांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करत केवळ खेळातच नव्हे तर शैक्षणिक क्षेत्रातही उत्तुंग यश मिळवले आहे.
निकिता देशमुखच्या या निवडीबद्दल शानभाग विद्यालयाचे संस्थापक आणि ज्येष्ठ क्रीडा मार्गदर्शक रमेश शानभाग विद्यालयाच्या संचालिका आचल घोरपडे, विद्यालयाच्या माध्यमिक विभागाच्या मुख्याध्यापिका रेखा गायकवाड, प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक भाग्येश कुलकर्णी, पालक संघाचे प्रतिनिधी, शिक्षक, शिक्षिका तसेच कार्यालयीन कर्मचारी यांनी निकिताचे अभिनंदन केले आहे.
Get all live and latest Marathi news, Maharashtra news and all exclusive, top marathi news headlines from politics, sports, ententertainment, business, all events from satara, all cities of Maharashtra, India.
पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता.
आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क - 7588638613

0 टिप्पण्या