जलसंधारणाची कामे पूर्णत्वास नेण्यासाठी तरतूद; ४६ सिमेंट काँक्रीट बंधारे होणार
Satara News : पाणी हेच जीवन आहे. शेती समृद्ध करण्यासाठी जलसिंचनाच्या योजना सुरळीत चालणे आवश्यक आहे. त्यासाठी शेतीच्या परिसरात जलसंचय मोठ्या प्रमाणात होणे गरजेचे आहे. वाई - खंडाळा - महाबळेश्वर मतदारसंघातील विविध गावात जलसंधारणाची कामे पूर्णत्वास नेण्यासाठी आमदार मकरंद पाटील यांनी ४६ सिमेंट काँक्रीट बंधाNयांसाठी सुमारे १० कोटी ८ लाख ४३ हजार रुपयांचा विशेष निधी मंजूर करून घेतला आहे. त्यामुळे शेती सिंचनाच्या योजनांना विशेष फायदा होणार आहे.
वाई, खंडाळा आणि महाबळेश्वर तालुक्यातील शंभर हेक्टरपेक्षा कमी क्षमतेचे क्षेत्र ओलिताखाली आणण्यासाठी परिसरातील विहिरी, कूपनलिका यांचा जलसाठा उंचावणे आवश्यक असल्याने संबंधित गावातील ओढ्यांवर सिमेंट काँक्रीट बंधारे, पाणी साठवण बंधारे बांधणे आवश्यक होते. तीनही तालुक्यातील स्थानिक ग्रामस्थ व शेतकNयांची मागणी असल्याने आमदार मकरंद पाटील यांनी विशेष प्रयत्न करून महाराष्ट्र जलसंधारण महामंडळाच्या माध्यमातून ४६ नवीन बंधाNयांच्या बांधकामासाठी दहा कोटीचा विशेष निधी मंजूर करुन घेतला आहे. यामुळे जनतेमधून समाधान व्यक्त केले जात आहे.
मंजूर गावांची नावे व उपलब्ध निधीची रक्कम लाखात याप्रमाणे...
वाई तालुका - सुरुर क्र.२ (२७ .०१), कोचळेवाडी (मयुरेश्वर) क्र. १ (२४.०१), कोचळेवाडी क्र. २ (२६.७०), गुळुंब (३४.७४), चांदक (२३.८४), लगडवाडी (२३.८०), मापरवाडी (२३.८४), वाकणवाडी (२१.८३), भुईंज क्र. १ (२७.०६), भुईंज क्र. २ (२४.९९), पाचवड क्र. १ (२६.७८), मांढरदेव क्र. १ (२७.१०), मांढरदेव क्र. २ (२२.३६), बोपेगाव (२३.३२), किकली (१८.४६), वरचे चाहूर, भुईज (३२.५३), वेळे क्र. १ (२७.२१), वेळे क्र. २ (२७.२१), बदेवाडी (२६.७७), वयगाव क्र. १ (२३.२३), वयगाव क्र. २ (२२.१८), बावधन (२०.५५), बोरगाव बुद्रुक (२२.२९), गुंडेवाडी क्र. १ (१७.७७), गुंडेवाडी क्र. २ (२०.३२).
खंडाळा तालुका - असवली क्र. २ (१७.०६), लोणंद (२७.५७), कवठे क्र. २ (२२.३९), धावडवाडी क्र. १ (२२.२१), धावडवाडी क्र. २ (२३.६९), भादे (२२.३०), अंदोरी (२४.७९), नायगाव (२३.९८), कवठे क्र. १ (२२.०७), असवली क्र. १ (२३.९७), बोरी (२२.२३), खेड बुद्रुक (२६.१८), शिरवळ (२५.१९), जवळे (२३.५८), बावडा (२०.१८), पाडळी (२१.९०).
महाबळेश्वर तालुका - मेटगुताड क्र. १ (२६.५२), मेटगुताड क्र. २ (२५.६६), मेटगुताड क्र. ३ (२७.५९), भिलार (२२.०९), धारदेव (२१.३८).
यापुढेही अनेक योजना राबविणार
वाई मतदारसंघातील गावोगावी शेती सिंचन सुरळीत होऊन शेतकNयांच्या उत्पन्नात वाढ व्हावी या उद्देशाने जलसंचयन होणे गरजेचे होते. लोकांच्या मागणीनुसार ही कामे पूर्ण होऊन त्याचा वापर सुरू होईल. शेतकNयांच्या शाश्वत विकासासाठी यापुढेही अनेक योजना राबविणार असल्याचे आमदार मकरंद पाटील यांनी सांगितले.
Get all live and latest Marathi news, Maharashtra news and all exclusive, top marathi news headlines from politics, sports, ententertainment, business, all events from satara, all cities of Maharashtra, India.
पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता.
आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क - 7588638613

0 टिप्पण्या