बँकेचे संस्थापक कर्नल आर. डी. निकम यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त विशेष कार्यक्रम
Satara News : सातारा येथील कर्नल आर. डी. निकम सैनिक सहकारी बँकेचे संस्थापक कर्नल आर. डी. निकम यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त बँकेच्या मुख्यालयात ैैै.ेaग्हग्व्ंaहव्.म्दस् या नवीन संकेतस्थळाचे उद्घाटन कमांडंट तानाजी पवार यांच्या हस्ते नुकतेच करण्यात आले. कार्यक्रमास कर्नल अरुण जाधव व अधिकारी उपस्थित होते. बँकेचे अध्यक्ष कॅप्टन उदाजीराव निकम कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते.
कर्नल आर. डी. निकम सैनिक सहकारी बँकेने चांगली प्रगती केली आहे. संघटना, बँक व वँâटिनची स्थापना सातारासारख्या नॉन मिलिटरी स्टेशनमध्ये करुन कर्नल निकम यांनी एक आदर्श निर्माण केला आहे, असे गौरवोद्गार कमांडंट तानाजी पवार यांनी यावेळी काढले. ग्राहकांच्या बदलत्या गरजा ओळखून बँकेने संस्थापक अध्यक्ष कर्नल आर. डी. निकम यांचे जन्मशताब्दीचे औचित्य साधून बँकेची वेबसाईट सुरु केली आहे. वेबसाईटवर बँकेच्या सर्व शाखांची तसेच विविध ठेव व कर्ज योजनांची माहिती तसेच इतर सर्व माहिती देण्यात आली आहे, अशी माहिती कॅप्टन निकम यांनी याप्रसंगी दिली.
यावेळी कर्नल जाधव यांचेही भाषण झाले. कार्यक्रमास संचालिका पुष्पा निकम, अश्पाक पटेल, सुभेदार तानाजी जाधव, कर्नल राजकुमार जाधव, सुभेदार मेजर श्रीमंतराज शिंदे, अलंकार जाधव, बँकेचे उपमहाव्यवस्थापक विलास मोटे आदी उपस्थित होते. मुख्य कार्यकारी अधिकारी यशवंत देसाई यांनी आभार मानले.
Get all live and latest Marathi news, Maharashtra news and all exclusive, top marathi news headlines from politics, sports, ententertainment, business, all events from satara, all cities of Maharashtra, India.
पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता.
आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क - 7588638613

0 टिप्पण्या