कर्मचार्यांनी घेतली औद्योगिक सुरक्षिततेसाठी सर्वोत्तम प्रयत्न करण्याची शपथ
Satara News : ५० व्या राष्ट्रीय सुरक्षा दिनानिमित्त यशवंतनगर (ता. कराड) येथील सह्याद्रि सहकारी साखर कारखान्याच्या कार्यस्थळावरील स्व. यशवंतरावजी चव्हाण यांच्या पूर्णाकृती पुतळ्यासमोर कारखान्याच्या कर्मचार्यांनी एकत्र येवून औद्योगिक सुरक्षिततेची शपथ घेतली. कारखान्याचे जनरल मॅनेजर पी. आर. यादव यांनी शपथ दिली.
यावेळी सर्व कर्मचार्यांनी, ‘सुरक्षितता, आरोग्य व पर्यावरणाच्या पालनासाठी स्वत:ला पूर्ण वाहून घेवून आमच्या स्वत:च्या, कुटुंबाच्या, आपल्या कारखान्याच्या, समाजाच्या व देशाच्या हितासाठी व रक्षणासाठी कारखान्यातील सर्व सुरक्षितता, आरोग्य व पर्यावरणासंदर्भातील नियमांचे व सूचनांचे पालन करू व आपल्या कारखान्यातील अपघात टाळण्यासाठी, उत्तम आरोग्यासाठी व पर्यावरणाच्या बचावासाठी सर्वोत्तम प्रयत्न करू’ अशी शपथ घेतली.
कार्यक्रमास मान्यवरांची उपस्थिती
यावेळी कारखान्याचे फायनान्शिअल अॅडव्हायझर एच. टी. देसाई, चीफ इंजिनिअर एस. एस. पाटील, चीफ केमिस्ट जी. पी. करांडे, कामगार व कल्याण अधिकारी एन. आर. जाधव, सेफ्टी ऑफिसर एस. बी. पाटील, सिव्हील इंजिनिअर वाय. जे. खंडागळे व यु. एल. पाटील, शेती अधिकारी एम. ए. पाटील, ईडीपी मॅनेजर पी. एस. सोनवणे, डिस्टीलरी इन्चार्ज डी. जे. जाधव, ऊस विकास अधिकारी व्ही. बी. चव्हाण, एस. जी. चव्हाण, जनसंपर्क अधिकारी व्ही. जे. शेलार, सुरक्षा अधिकारी एस. बी. नाईगडे, हेड टाईम किपर विकास चव्हाण यांच्यासह सर्व विभागप्रमुख, कर्मचारी उपस्थित होते.
Get all live and latest Marathi news, Maharashtra news and all exclusive, top marathi news headlines from politics, sports, ententertainment, business, all events from satara, all cities of Maharashtra, India.
पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता.
आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क - 7588638613

0 टिप्पण्या