कोरोना प्रादुर्भाव रोखण्याच्या अनुषंगाने आदेश जारी; आदेश न पाळल्यास कारवाई
Satara News : सातारा जिल्ह्यात कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव रोखण्याच्या अनुषंगाने दि. ११ मार्च रोजी होणारा महाशिवरात्री उत्सव अत्यंत साधेपणाने व शासनाने वेळोवेळी दिलेल्या नियमांचे तसेच सामाजिक अंतराचे पालन करुन साजरा करावा, असे आवाहन जिल्हादंडाधिकारी शेखर सिंह यांनी केले आहे.
याअनुषंगाने जिल्हाधिकारी यांनी आदेश जारी केला आहे. त्यात म्हटले आहे, की कोविड-१९ च्या संसर्गजन्य परिस्थितीचा विचार करता महाशिवरात्री उत्सव अत्यंत साधेपणाने साजरा करावा. त्या अनुषंगाने सर्व मंदिर विश्वस्त, व्यवस्थापक यांनी मंदिरात देवदर्शनासाठी गर्दी होणार नाही व सामाजिक अंतराचे पालन होईल याकडे विशेष लक्ष द्यावे. भाविकांनी घराबहेर न पडता शक्यतो घरात राहूनच पूजाअर्चा करावी. प्रत्येक शिवमंदिराच्या आतील बाजूस सामाजिक अंतराचे पालन होण्याच्या दृष्टीने एकावेळी फक्त २० भाविक दर्शन घेतील. मंदिराच्या परिसरात हार व फुले विक्रेते यांची गर्दी होणार नाही तसेच सामाजिक अंतराच्या नियमांचे तंतोतंत पालन होईल याकडे मंदिराच्या व्यवस्थापकांनी लक्ष द्यावे. प्रत्यक्ष मंदिरात येऊन दर्शन घेऊ इच्छिणार्या भाविकांनी स्वत:हून मास्कचा वापर व सामाजिक अंतराचे पालन करावो. ज्येष्ठ नागरिक व लहान मुलांना मंदिरात दर्शनाकरिता आणू नये. मंदिर व्यवस्थापनाने आजूबाजूच्या परिसरात निर्जंतुकीकरणाची व्यवस्था करावी. महाशिवरात्रीनिमित्त शिवमंदिरातील व्यवस्थापक यांनी दर्शनाची सुविधा ऑनलाईन, केबल नेटवर्क, बेवसाईट व फेसबुक इत्यादीद्वारे उपलब्ध करुन द्यावी.
या आदेशाची अंमलबजावणी करण्यास संबंधितांनी टाळाटाळ केल्यास अथवा विरोध दर्शविल्यास त्यांच्याविरुध्द यथास्थिती आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ चे कलम ५१, भारतीय साथरोग अधिनियम १८९७ व भारतीय दंड संहिता (४५ ऑफ १८६०) कलम १८८ नुसार दंडनीय, कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असेही आदेशात नमूद केले आहे.
Get all live and latest Marathi news, Maharashtra news and all exclusive, top marathi news headlines from politics, sports, ententertainment, business, all events from satara, all cities of Maharashtra, India.
पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता.
आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क - 7588638613

0 टिप्पण्या