Satara News : ‘इशारों इशारों में’ प्रथमच पश्चिम महाराष्ट्रात


आगळ्यावेगळ्या प्रेमकहाणीसह सागर कारंडे येतोय रसिक प्रेक्षकांच्या भेटीला

Satara News : नाटक असो, मालिका असो अथवा चित्रपट. मनोरंजनाच्या वेगवेगळ्या माध्यमांत आपल्या विनोदाची खणखणीत छाप पाडणारा झी मराठी वरील 'चला हवा येऊद्या' या कार्यक्रमातून रसिक प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेला अभिनेता सागर कारंडे ‘इशारों इशारों में’ या रोमँटिक नाटकासोबत पश्चिम महाराष्ट्रात येत आहे. 

हे नाटक प्रथमच पश्चिाम महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येत असल्याची माहिती नाटकाचे निर्माते अजय कासुर्डे यांनी सातारा येथे पत्रकार परिषदेत दिली. याप्रसंगी अभिनेता सागर कारंडे, प्रवीण भोसले, स्वप्नील माने, मंदार काणे, आनंद कदम आदी उपस्थित होते.

भावनेला हात घालणारा नाट्याविष्कार

अबोल मनाचा बोलका अविष्कार म्हणजेच हे नाटक म्हणावे लागेल. त्यामध्ये विनोद, रोमान्स आहे. भावनेला हात घालणारे प्रसंग आहेत. वेगळेपणही आहे. एक बोलका आणि एक अबोल या दोन जिवांच्या प्रेमाची ही गोष्ट आहे. एका व्यक्तीला कोणाचा एक शब्दही ऐकू येत नाही, सर्वच डोळ्यांनी समजून घ्यायचं आहे. अशा व्यक्तीचा आवाज सुरु होवून ते नाटक मनाला हळवे करते. मूळ गुजराती नाटकाचा हा मराठी नाट्याविष्कार आहे, असे सागर कारंडे यांनी यावेळी सांगितले.

कॉम्प्युटर इंजिनिअर असलेल्या सागर कारंडे यांनी २००२ साली प्रथमच रंगभूमीवर पाऊल टाकले. त्यांच्या अभिनयातील वेगवेगळेपणाने नेहमीच प्रेक्षकांना काहीतरी अनोखे दिले आहे. 

या नाटकाची मूळ संकल्पना आणि दिग्दर्शन जय कापडिया यांचे आहे. 

पश्चिम महाराष्ट्र दौरा असा...

‘इशारों इशारों में’ हे नाटक शुक्रवार दि. 2 एप्रिल रोजी सायंकाळी 7 वाजता कोल्हापूर येथील केशवराव भोसले नाट्यगृह, शनिवार दि. 3 एप्रिल रोजी सायंकाळी 7 वाजता सांगली येथील विष्णुदास भावे नाट्यमंदिर आणि दि. 4 रोजी सायंकाळी 7 वाजता सातारा येथे शाहूकला मंदिरात या नाटकाचे आयोजन करण्यात आले आहे.

Get all live and latest Marathi news, Maharashtra news and all exclusive, top marathi news headlines from politics, sports, ententertainment, business, all events from satara, all cities of Maharashtra, India.

आजच्या ताज्या बातम्या  

पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता.

आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क - 7588638613

 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या