Satara News : शुभमंगल... सावधान; आता फक्त ५० लाच परवानगी


कोरोना पार्श्वभूमीवर लग्न समांरभासाठी जिल्हाधिकार्‍यांनी केले सुधारित आदेश जारी

Satara News : सातारा जिल्ह्यातील कोरोना विषाणू संशयित अथवा संक्रमिक रुग्ण संख्येवर नियंत्रण आणण्यासाठी लग्न समारंभाबाबत जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी सुधारित आदेश जारी केले आहेत.

या आदेशानुसार...

  • लग्न समारंभाच्या कार्यात जास्तीत जास्त ५० व्यक्तींनाच (भटजी, वाजंत्री, स्वयंपाकी, वाढपीसह) उपस्थित राहण्याबाबत परवानगी राहील. 
  • लग्न समारंभाच्या अगोदर लग्न कार्याच्या कार्यक्षेत्रातील संबंधीत पोलीस स्टेशनचा ना हरकत परवाना घेवून संबंधीत तहसीलदार यांची पूर्वपरवानगी घेणे बंधनकारक राहील. 
  • फक्त मंगल कार्यालयामध्ये सनई-वाद्यास परवानगी राहील. याव्यक्तीरिक्त ज्या ठिकाणी लग्न कार्य आहे अशा मंगल कार्यालयाच्या बाहेरील परिसरात अथवा आवारात कोणत्याही प्रकारचे बॅन्जो-बँड, डिजे अथवा फटाके वाजविण्यास पूर्णपणे मनाई राहील.
  • संपूर्ण लग्न समारंभात वधु व वर या दोन्ही पक्षाकडील आणि उर्वरित सर्व नागरिकांना पूर्णवेळ मास्क वापरणे व सोशल डिस्टंसिंग पाळणे बंधनकारक राहील.
  • मंगल कार्यालय व्यवस्थापनाने लग्न कार्यालयात पुरेशा प्रमाणात सॅनिटायझर उपलब्ध करुन देणे बंधनकारक राहील. 
  • ६५ वर्षावरील ज्येष्ठ नागरिक, आजारी व्यक्ती (मधुमेह, रक्तदाब, श्वसनाचे विकार) व्यक्तीस लग्न कार्यात सहभागी होण्यास मनाई असेल. तथापि सख्ख्या रक्त नात्यातील आजी व आजोबा इत्यादिंना उपस्थित राहण्यास परवानगी राहील.

आदेशाचा भंग केल्यास कठोर कारवाई

हॉटेल, रिसॉर्ट, लॉन्स, मंगल कार्यालये इत्यादी ठिकाणी आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात कोविड-१९ च्या अनुषंगाने निर्गमित करण्यात आलेल्या आदेशाचा भंग केल्यास संबंधित व्यवस्थापन यांच्याकडून प्रथमवेळी २५ हजार रुपये दंड तसेच दुसर्‍या वेळी भंग झाल्यास १ लाख व फौजदारी कारवाई करण्यात येईल व संबंधित कार्यक्रम आयोजकांकडून १० हजार रुपये दंड व फौजदारी कारवाई करण्यात येईल.

आदेशातील सर्व अटी व शर्थींचे पालन न करणारी संस्था/कार्यालय अथवा कोणतीही व्यक्ती यांनी साथरोग प्रतिबंधक कायदा १९८७ व आपत्ती व्यवस्थापन अधिनियम २००५ तसेच भारतीय दंड संहिता १८६० नुसार शिक्षेस पात्र असलेला अपराध केला असे मानण्यात येवून नियमानुसार योग्य ती कारवाई संबंधितांवर करण्यात येईल, असेही जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी आदेशात नमूद केले आहे.

Get all live and latest Marathi news, Maharashtra news and all exclusive, top marathi news headlines from politics, sports, ententertainment, business, all events from satara, all cities of Maharashtra, India.

आजच्या ताज्या बातम्या  

पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता.

आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क - 7588638613

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या