Satara News : फलटण ते पुणे रेल्वे सेवा सुरू होणार


अत्यावश्यक सेवेतील लोकांच्या सोयीसाठी बुधवारपासून नियमित सेवेस प्रारंभ

Satara News : रेल्वे प्रशासनाने अत्यावश्यक सेवेतील लोकांच्या सोयीसाठी फलटण ते पुणे आणि परतीसाठी डेमु रेल्वे सेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. फलटण-पुणे दरम्यान अनारक्षित डब्यांची ही नियमित डेमू सेवा बुधवार 31 मार्चपासून सुरू होईल.

तत्पूर्वी मंगळवारी 30 मार्च रोजी याच मार्गावर उद्घाटन विशेष गाडी चालविण्यात येणार असून या विशेष गाडीचे उद्घाटन रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांच्या हस्ते व्हिडिओ लिंकद्वारे हिरवा  झेंडा दाखवून फलटण स्टेशन येथून गाडी रवाना केली जाईल.  ही गाडी सुरवडी, लोणंद, नीरा, जेजुरी आणि सासवड रोड स्टेशनवर थांबेल.

गाडीला रविवारी साप्ताहिक सुट्टी

अत्यावश्यक सेवेतील लोकांसाठी ही गाडी क्रमांक 01435  पुणे येथून 05.50 वाजता सुटेल व  09.35 वाजता फलटणला पोहोचेल व परतीच्या प्रवासात गाडी क्रमांक 01436 फलटण येथून 18.00 वाजता सुटेल व पुणे येथे 21.35 वाजता पोहोचेल. ही गाडी सुरवडी, लोणंद, नीरा, जेजुरी व सासवड रोड स्टेशनवर थांबेल. रविवारी ही सेवा बंद राहील.

राज्य शासनाने स्थानिक प्रशासकीय स्तरावर अत्यावश्यक सेवेतील संबंधित लोकांना फलटणचे प्रांत अधिकारी  यांच्याकडून क्यूआर कोड आधारित ओळखपत्रे / पास  दिले जातील व पुणे पोलीस आयुक्त यांना नोडल ऑफिसर म्हणून नेमण्यात आले आहे. जे संपूर्ण प्रक्रिया पूर्ण करून क्यूआर कोड आधारित ओळखपत्रे / पास जारी करतील. फलटणचे प्रांत अधिकारी व पुण्याचे पोलीस आयुक्त अत्यावश्यक सेवेतील  लोकांची ओळख पटवून त्यांना ओळखपत्र जारी करतील. ही ओळखपत्रे क्यू आर कोड आधारित/ पास आधारित असतील.

पास दाखवून तिकीट मिळणार

अत्यावश्यक सेवेतील लोक स्टेशनवर क्यूआर कोड आधारित ओळखपत्र/पास दाखवून तिकीट खरेदी करून प्रवास करू शकतात.

Get all live and latest Marathi news, Maharashtra news and all exclusive, top marathi news headlines from politics, sports, ententertainment, business, all events from satara, all cities of Maharashtra, India.

आजच्या ताज्या बातम्या  

पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता.

आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क - 7588638613

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या