Satara News : ... तर जिल्हाधिकार्‍यांच्या दालनात आत्मदहन


पर्यायी जमीन वाटपात झोलझाल झाल्याचा उरमोडी प्रकल्पग्रस्ताचा आरोप 

Satara News : माण तालुक्यातील पळशी येथील पर्यायी जमिनीच्या बदली प्रस्तावासंदर्भात जमीन क्षेत्राचे अनाधिकाराने परस्पर वाटप केल्याचा आरोप उरमोडी प्रकल्पातील धरणग्रस्त दीपक शंकर देवरे (कातवडी बुद्रुक, पो. नित्रळ, ता. सातारा) यांनी केला आहे. पर्यायी जमिनीचे वाटप योग्य पद्धतीने न झाल्यास २९ मार्चला जिल्हाधिकार्‍यांच्या दालनात आत्मदहन करणार असल्याचा इशाराही त्यांनी पत्रकार परिषदेत दिला.

सुमारे साडेचार एकर जमीन १९९७ साली उरमोडी धरण प्रकल्पात गेली होती. त्याला पर्यायी जमिनी पळशी येथे देण्याचा शासन निर्णय झाला होता. १७९२ गटातील १ हेक्टर २० आर क्षेत्राचे वाटप झाले. मात्र संकलन पत्रात २ हेक्टर २६ आर क्षेत्राचे वाटप असताना गट क्र. ४० मधील केवळ १ हेक्टर आर क्षेत्राची नजरचुकीने नोंद झाली, असे त्यांनी सांगितले. याप्रकरणी न्याय न मिळाल्यास २९ मार्च रोजी जिल्हाधिकार्‍यांच्या दालनात आत्मदहन करण्याचा इशारा त्यांनी निवेदनाद्वारे दिला आहे.

Get all live and latest Marathi news, Maharashtra news and all exclusive, top marathi news headlines from politics, sports, ententertainment, business, all events from satara, all cities of Maharashtra, India.

आजच्या ताज्या बातम्या  

पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता.

आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क - 7588638613

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या