कोरोनाच्या पार्श्वभूमीवर व्हीडीओ कॉन्फरन्सद्वारे होणार वार्षिक सभेचे कामकाज
Satara News : सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची ७० वी वार्षिक सर्वसाधारण सभा शनिवार दि. २० मार्च २०२१ रोजी दुपारी १ वाजता बँकेच्या मुख्य कार्यालयाच्या नवीन प्रशासकीय इमारतीतील यशवंतराव चव्हाण सभागृहात होणार आहे. त्याचबरोबर कोरोनाच्या पार्श्वभूमीवर व्हीडीओ कॉन्फरन्सद्वारे विभागीय कार्यालयातून सभासदांना या कामकाजात सहभागी होता येणार आहे.
जिल्ह्याच्या कृषी व ग्रामीण विकासाची प्रमुख अर्थवाहिनी असणार्या या बँकेने उत्कृष्ठ कार्यक्षमतेचे नाबार्डचे सलगपणे ६ पुरस्कार मिळाले आहेत. त्याचबरोबरच महाराष्ट्र शासन, नॅफस्कॉब, राज्य बँक, महारास्ट्र स्टेट को - ऑप बँक्स असोसिएशन तसेच देशातील इतर सहकारी संस्थांकडून विविध ९० पुरस्काराने बँकेस गौरवण्यात आले आहे. नुकतेच बँकिंग प्रâंटिअर्स या नामांकित संस्थेमार्फत बँकेस ’सर्वोत्कृष्ट जिल्हा सहकारी बँक' व 'सर्वोत्कृष्ट डीजीटल जिल्हा सहकारी बँक’ या पुरस्काराने गौरविले असून बँकेने कोरोनाच्या काळात मंदीचे सावट व आर्थिक घडामोडीच्या काळातही उत्कर्षपथावरील आपली घोडदोड कायम ठेवलेली आहे.
करपूर्व ढोबळ नफा ८५.३१ कोटी
संपलेल्या आर्थिक वर्षात बँकेला उच्चांकी करपूर्व ढोबळ नफा ८५ कोटी ३१ लाख तर सर्व तरतुदीनंतर निव्वळ नफा रु. ४६ कोटी इतका झालेला आहे. बँकेबद्दल जनतेमध्ये असलेली प्रचंड विश्वासार्हता व बँकेची उत्कृष्ठ कार्यप्रणाली यामुळे बँकेच्या ठेवींत भरघोस वाढ झाली असून बँकेने मार्च २०२० अखेर ७६०० कोटी रूपये इतकी मजल गाठली आहे. बँकेची कर्जवसुली विक्रमी असून निव्वळ एनपीएचे प्रमाण 'शून्य' टक्के आहे. गोरगरीब शेतकरी, सर्वसामान्य यांच्या आर्थिक उन्नतीसाठी कृषी ग्रामीण विकासाच्या अनेक नवनवीन योजना बँकेने राबविल्या असून जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासात बँकेचे मोलाचे योगदान आहे.
अहवाल सालात झालेल्या नफ्यातून बँकेने कर्जदार शेतकरी सभासद, विकास सेवा सोसायट्या, सचिव इत्यादिसाठी भरीव तरतूद केली आहे. सातारा जिल्हा बँक, बँकींग कामकाजाबरोबर विकासाभिमुख कार्यात नेहमीच अग्रेसर असते. बँकेने महाराष्ट्रातच नव्हे तर देशामध्ये ज्या-ज्या वेळी नैसर्गिक आपत्ती आली आहे, त्या-त्या वेळी आर्थिक मदत केली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बँकेच्या मा. संचालक यांचा सभा भत्ता व बँक अधिकारी व कर्मचारी यांचे एक दिवसाचे वेतन अशी एकूण रक्कम १६ लाख रूपये तसेच सन २०१९ - २० च्या ढोबळ नफ्यातून रक्कम १ कोटीचा निधी मुख्यमंत्री सहाय्यता निधीस आणि जिल्ह्यातील स्थलांतरीत, मोलमजुरी करणारे मजूर / शेतमजूर व गरजू कुटुंबांना त्यांच्या दैनंदिन उदरनिर्वाहासाठी जीवनावश्यक अन्नधान्याचे किट उपलब्ध करुन दिले असून यासाठी बँकने अंदाजित १ कोटी रूपये खर्च केलेले आहेत.
ऑडिट वर्ग ‘अ’ परंपरा कायम
बँकेची ऑडीट ‘अ’ वर्गाची परंपरा कायम राखली आहे. गुणवत्ता व आधुनिक बँकिंगद्वारे ग्राहकाभिमुख सेवा यामुळे बँकेस आयएसओ ९००१:२०१५ मानांकन प्राप्त झाले असून बँक युपीआय सर्व्हरला लिंक झाल्याने ग्राहकांना फोन बील भरणे, लाईट बील भरणे, ई-कॉमर्स इत्यादि सर्व व्यवहार घरबसल्या काही क्षणात करता येणार आहेत. गुगल पे, फोनपे, पेटीएम, अॅमेझोन या प्रकारचे अॅप्लीकेशनद्वारे मोठ्या प्रमाणात जलद डिजीटल व्यवहार करता येतील.
अशा लौकिक प्राप्त बँकेच्या ७० व्या वार्षिक सर्वसाधारण सभेस बँकेच्या सर्व सभासदांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कळविलेल्या सूचनांप्रमाणे उपस्थित राहावे. सभासदांना जनरल सभेस उपस्थित राहता यावे म्हणून संबंधित तालुक्याच्या विभागीय कार्यालयात व्हिडीओ कॉन्फरन्सची सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे. अधिक माहितीसाठी नजीकच्या शाखेस अथवा मुख्य कार्यालयाशी संपर्क साधावा. या सभेस सर्व सभासदांनी उपस्थित रहावे, असे आवाहन बँकेचे अध्यक्ष आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले व मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र सरकाळे यांनी केले आहे.
Get all live and latest Marathi news, Maharashtra news and all exclusive, top marathi news headlines from politics, sports, ententertainment, business, all events from satara, all cities of Maharashtra, India.
पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता.
आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क - 7588638613

0 टिप्पण्या