पीडित महिलेची सातारा शहर पोलीस ठाण्यात दोन भामट्यांविरोधात तक्रार
Satara News : लग्नाचे आमिष दाखवून एका ५० वर्षीय महिलेकडून १ लाख रुपये घेऊन तिच्यावर दोघांनी अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे. याबाबतची तक्रार संबंधित महिलेने सातारा शहर पोलीस ठाण्यात दिली आहे. यावरुन पोलिसांनी शंकर खरात, संकेत लोखंडे (दोघे रा. पिरवाडी, सातारा) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
पीडित महिला व संशयितांची २०१३ मध्ये ओळख झाली. संबंधित पीडित महिला एकटीच राहत आहे. ती स्वत:च्या लग्नासाठी स्थळ शोधत होती. याची माहिती या दोघा संशयितांना मिळाल्यानंतर त्यांनी महिलेशी ओळख वाढवली. आम्ही तुमचे लग्न लावून देतो, यासाठी एक लाख रुपये खर्च येईल, असे त्यांनी या महिलेला सांगितले.
धमकी देऊन वारंवार अत्याचार
पीडित महिलेने एक लाखाची रक्कम संशयितांना दिली. पैसे दिल्यानंतर संशयित दोघे रात्री उशिरा महिलेच्या घरी गेले. लग्नासाठी फोटो पाहिजे, असे सांगून त्यांनी महिलेशी लगट करण्याचा प्रयत्न केला. या प्रकारामुळे संबंधित पीडित महिला घाबरली. संशयितांनी धमकी देऊन जबरदस्तीने तिच्यावर अत्याचार केला. ही घटना २०१३ मध्ये घडली असून, असा प्रकार वारंवार होऊ लागल्यानंतर पीडित महिलेने सातारा शहर पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली.
Get all live and latest Marathi news, Maharashtra news and all exclusive, top marathi news headlines from politics, sports, ententertainment, business, all events from satara, all cities of Maharashtra, India.
पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता.
आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क - 7588638613

0 टिप्पण्या