आर्चरी खेळाडू अस्मिता सावंतला क्रीडा साहित्य घेण्यासाठी स्वीकारले प्रायोजकत्व
Satara News : येथील लालबहादूर शास्त्री महाविद्यालयाची आर्चरी खेळाडू अस्मिता शंकर सावंत हिने राज्यस्तरीय आर्चरी स्पर्धेत रौप्यपदक मिळवले आहे. मात्र पुढील स्पर्धेत सहभागी होण्यासाठी खेळाचे साहित्य घेण्यासाठी अडचणी निर्माण झाल्या. तिला कूपर कॉर्पोरेशन प्रा. लि.चे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक फरोख कूपर यांच्याकडून ५० हजारांचे प्रायोजकत्व मिळाले.
अस्मिता सावंत हिला वाव मिळावा यासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. राजेंद्र शेजवळ, ज्यु. जिमखाना प्रमुख प्रा. विनायक भोई यांनी शक्य तेवढी मदत केली. या विद्यार्थिनीने आर्चरी खेळात केलेली उत्कृष्ट कामगिरी प्राचार्य डॉ. राजेंद्र शेजवळ यांनी फरोख उद्योजक कूपर व कूपर समुहाचे एचआर हेड नितीन देशपांडे यांना सांगितली. फरोख कूपर यांनी दाखवलेल्या औदार्याबद्दल क्रीडा क्षेत्रातून समाधान व्यक्त होत आहे.
Get all live and latest Marathi news, Maharashtra news and all exclusive, top marathi news headlines from politics, sports, ententertainment, business, all events from satara, all cities of Maharashtra, India.
पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता.
आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क - 7588638613

0 टिप्पण्या