सातारा बसस्थानक चौकीच्या पोलिसांच्या कर्तव्यदक्षपणाचे सर्वत्र कौतुक
Satara News : पुणे - सातारा प्रवासादरम्यान एका महिलेचे एसटी बसमध्ये हरवलेले सोन्याचे दागिने व रोकड सातारा बसस्थानक चौकीतील पोलीस कर्मचाऱ्यांच्या तत्परतेमुळे संबंधित महिलेला परत मिळाले. आज घडलेल्या या घटनेमुळे संबंधित कर्तव्यदक्ष पोलीस कर्मचाऱ्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
आज (दि. २१ मार्च) संध्याकाळी विद्या दिलीप निंबाळकर (वय ५२, रा. कोंडवे, ता. जि. सातारा) या पुण्यावरून सातारा येथे प्रवास करीत असताना त्यांचे पाकीट सातारा - पुणे विनावाहक - विनाथांबा बसमध्ये हरवलेले होते. ही बस परत प्रवासी घेऊन पुणेसाठी रवाना झाल्यानंतर विद्या निंबाळकर यांच्या लक्षात आले की आपले पाकीट बसमध्ये कुठेतरी हरवलेले आहे.
त्यांनी तात्काळ एसटी स्टँड पोलीस चौकी येथे संपर्क साधून घडला प्रकार सांगितल्यानंतर एसटी स्टँड पोलीस चौकीतील पोलीस हवालदार दत्तात्रय पवार, पोलीस कॉन्स्टेबल अजयराज देशमुख, विलास गेडाम, अंजली बामणे यांनी तात्काळ सूत्रे फिरवत त्या एसटीचे ड्रायव्हर आणि कंडक्टरच्या संपर्कात राहून गाडी परत सातारा बसस्थानकात येताच गाडीची झडती घेऊन पैसे असलेले पाकीट व सोन्याचे दागिने शोधून हस्तगत करून जवळपास एक लाखाचा मुद्देमाल संबंधित महिलेच्या ताब्यात परत दिला.
Get all live and latest Marathi news, Maharashtra news and all exclusive, top marathi news headlines from politics, sports, ententertainment, business, all events from satara, all cities of Maharashtra, India.
पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता.
आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क - 7588638613

0 टिप्पण्या