Satara News : अतितमध्ये एकाच कुटुंबातील तिघांना मारहाण


आंब्याची फांदी तोडल्याचा जाब विचारल्याने भडका; बोरगाव पोलिसात गुन्हा दाखल

Satara News : सातारा तालुक्यातील अतित येथे आंब्याची फांदी तोडल्याचा जाब विचारला म्हणून पाच जणांनी एकाच कुटुंबातील तिघांना मारहाण केली. यात एकजण जखमी झाला. राजेंद्र दादासो कारंडे असे जखमी झालेल्या इसमाचे नाव आहे. याबाबतची फिर्याद तुषार राजेंद्र कारंडे (रा. अतित, ता. सातारा) यांनी बोरगाव पोलीस ठाण्यात दिली.

तुषार राजेंद्र कारंडे हे त्यांचे आई व वडील राजेंद्र दादासो कारंडे यांच्यासमवेत त्यांच्या उपळनगर नावाच्या शिवारात गेले होते. तिथे त्यांना आंब्याची फांदी तोडल्याचे लक्षात आले. या गोष्टीचा जाब त्यांनी एकनाथ सखाराम कारंडे यांना विचारला असता जाब का विचारला म्हणून एकनाथ सखाराम कारंडे व त्यांच्या घरातील श्रीकांत दिलीप कारंडे, अनिकेत दिलीप कारंडे, दिलीप एकनाथ कारंडे, अपर्णा दिलीप कारंडे या सर्वांनी राजेंद्र कारंडे, तुषार कारंडे व विद्या कारंडे यांना मारहाण केली. यात एकजण जखमी झाला. 

या घटनेची नोंद बोरगाव पोलीस ठाण्यात झाली असून सहाय्यक फौजदार बाजीराव पायमल तपास करत आहेत.

Get all live and latest Marathi news, Maharashtra news and all exclusive, top marathi news headlines from politics, sports, ententertainment, business, all events from satara, all cities of Maharashtra, India.

आजच्या ताज्या बातम्या  

पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता.

आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क - 7588638613

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या