Satara News : साताऱ्यात दोन हॉटेलवर पोलिसांची कारवाई


कोरोनाच्या पार्श्वभूमीवर निर्धारित वेळेपेक्षा अधिक काळ सुरू ठेवल्यामुळे गुन्हा दाखल
 

Satara News : कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर सातारा जिल्ह्यात आपत्कालीन कायद्याची कडक अंमलबजावणी करण्यात येत असून निर्धारित वेळेपेक्षा अधिक काळ हॉटेल सुरू ठेवल्याप्रकरणी सातारा येथील दोन हॉटेलवर पोलिसांनी कारवाई केली आहे. शाहूपुरी पोलिसांनी हॉटेल अतिथी, तर सातारा तालुका पोलिसांनी हॉटेल नितीराजवर कारवाई केली आहे. 

सातारा येथील मोळाचा ओढा परिसरातील सातारा ते पुणे रस्त्यावर असणारे हॉटेल अतिथी हे निर्धारित वेळेपेक्षाही अधिक काळ सुरु होते. म्हणून हॉटेल चालक सुनील त्रिंबके (वय ५७, रा. २९० मल्हार पेठ, सातारा) यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. पोलीस नाईक पवार तपास करत आहेत. तसेच सैदापूर गावच्या हद्दीत सातारा ते पुणे रस्त्यावरील हॉटेल नितीराज हॉटेल निर्धारित वेळेपेक्षा अधिक काळ सुरु होते. याची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर त्यांनी तेथे पाहणी केली असता जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचे उल्लंघन झाले असल्याचे समोर आले. याप्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल गजानन देवकते यांनी तक्रार दिल्यानंतर दीपक तुकाराम पवार (वय ४८, रा. शाहूपुरी, सातारा) यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.

Get all live and latest Marathi news, Maharashtra news and all exclusive, top marathi news headlines from politics, sports, ententertainment, business, all events from satara, all cities of Maharashtra, India.

आजच्या ताज्या बातम्या  

पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता.

आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क - 7588638613

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या