मोठ्या संख्येने शेतकरी - व्यापारी जमा होण्याची शक्यता असल्याने निर्णय
Satara News : जावली कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने भरवण्यात येत असलेला मेढा व आनेवाडीचा जनावरांचा वार्षिक बाजार कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर रद्द करण्यात आला असल्याची माहिती बाजार समिती सभापती राजेंद्र शिंदे यांनी दिली.
मेढा व आनेवाडी येथे जनावरांचा वार्षिक बैल बाजार होळीपासून भरतो. मात्र यावर्षी कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी यांनी अनेक जत्रा, यात्रा व धार्मिक कार्यक्रमांना बंदी घातली आहे. त्याच पार्श्वभूमीवर तहसिलदार राजेंद्र पोळ यांनी जनावरांचा बाजार रद्द करण्याच्या सूचना बाजार समितीस केल्या आहेत. मेढा व आनेवाडी येथील वार्षिक बाजारात सातारा जिल्ह्यासह पुणे, सोलापूर, रायगड तसेच कर्नाटक राज्यातून बैल घेवून शेतकरी व व्यापारी खरेदी विक्रीसाठी मोठ्या प्रमाणात येतात. या बैल बाजारात मोठ्या संख्येने शेतकरी व्यापारी जमा होण्याची शक्यता असल्याने कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी तहसिलदार यांनी हा आदेश दिला आहे.
सहकार्य करण्याचे आवाहन
तरी या बैल बाजारासाठी येणार्या शेतकरी, व्यापारी व परिसरातील नागरिकांनी प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन बाजार समितीचे सचिव महेश देशमुख यांनी केले आहे. यावेळी बाजार समितीचे संचालक चंद्रकांत तरडे इनामदार, राम पवार, शांताराम पार्टे, बाळासाहेब ओंबळे, सुनिल देशमुख, शिवाजी गोरे, दिलीप परामणे, राजेंद्र गोळे उपस्थित होते.
Get all live and latest Marathi news, Maharashtra news and all exclusive, top marathi news headlines from politics, sports, ententertainment, business, all events from satara, all cities of Maharashtra, India.
पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता.
आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क - 7588638613

0 टिप्पण्या