Satara News : आता जिल्ह्यात लसीकरणासाठी ज्येष्ठांचा नंबर


हृदयरोग, मधुमेह, दुर्धर आजार असणार्‍या ४५ वर्षावरील नागरिकांनाही मिळणार लस

Satara News :  ४५ ते ५९ वर्षे वयोगटातील कोमोर्बीड (हृदयरोग, मधुमेह, दुर्धर आजार) असणार्‍या व्यक्तींना व ६० वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांना कोविड लसीकरण करण्यात येणार आहे. या लसीसाठी नागरिकांनी  https://selfregistration.cowin.gov.in  या लिंकचा वापर करुन आपल्या नावाची नोंदणी करावी. ज्या व्यक्तींना ऑनलाईन नोंदणी करता येणार नाही त्यांनी आपले आधार कार्ड घेऊन लसीकरण सत्राच्या ठिकाणी भेट देऊन नोंदणी करुन लसीकरण करुन घ्यावे, असे आवाहन जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी केले आहे.

केंद्र व राज्य शासनाच्या सूचनेनुसार सातारा जिल्ह्यातील कोविड-१९ लसीकरण कार्यक्रमांतर्गत ४६ हजार ११० जणांनी नोंदणी केली होती. त्यापैकी ३७ हजार ५३३ जणांनी पहिली लस घेतली असून ७ हजार ८०६ जणांनी लसीचा दुसरा डोस घेतला आहे. यामध्ये दुर्धर आजार असणार्‍या २९ जणांना तर ६० वर्षावरील १५९ नागरिकांनाही लस देण्यात आली आहे.

या ठिकाणी मिळणार मोफत लस

सद्यस्थितीमध्ये १८ शासकीय व ५ खासगी आरोग्य संस्थेत लसीकरण करण्यात येत आहे. जिल्ह्यातील शासकीय आरोग्य संस्थांमध्ये क्रांतिसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, फलटण व कराड उपजिल्हा रुग्णालय, पाटण, ढेबेवाडी, कोरेगाव, दहिवडी, खंडाळा, वडूज, महाबळेश्वर ग्रामीण रुग्णालय तसेच चिंचणेर वंदन, मल्हार पेठ, म्हसवड, पुसेगाव प्राथमिक आरोग्य केंद्र, फलटण, गोडोली-सातारा नागरी आरोग्य केंद्र, पूज्य कस्तुरबा आरोग्य केंद्र, सातारा या ठिकाणी कोविड लस मोफत देण्यात येणार आहे.

या ठिकाणी मिळणार सशुल्क लस

तसेच नोंदणीकृत खासगी आरोग्य संस्था ओंन्को लाईफ क्लिनिक (तामजाईनगर), कृष्णा वैद्यकीय महाविद्यालय (कराड), सह्याद्री हॉस्पिटल (कराड), शारदा क्लिनिक एरम हॉस्पिटल (कराड), मिशन हॉस्पिटल (वाई) या ठिकाणी २५० प्रती डोस याप्रमाणे शुल्क घेऊन लस देण्यात येणार आहे. भविष्यामध्ये लसीकरण सत्राची संख्या व ठिकाण मार्गदर्शक सूचनांनुसार वाढविण्यात येणार असल्याचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध आठल्ये यांनी सांगितले आहे.

Get all live and latest Marathi news, Maharashtra news and all exclusive, top marathi news headlines from politics, sports, ententertainment, business, all events from satara, all cities of Maharashtra, India.

आजच्या ताज्या बातम्या  

पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता.

आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क - 7588638613

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या