Satara News : वनवासवाडीला काळेश्वरी मंदिरासमोर पशूहत्या नको


सातारा जिल्हा अंधश्रध्दा निर्मूलन समितीची जिल्हा प्रशासनाकडे मागणी
 

Satara News : प्रतिवर्षी प्रमाणे सातारा - कोरेगाव मार्गावरील कृष्णानगर (वनवासवाडी) येथील नाईक वीट भट्टीमागे असलेल्या काळूबाई मंदिर परिसरात भरवली जाणारी यात्रा व त्या ठिकाणी (दि. ३ मार्च २०२१ रोजी) पहाटेपासून श्री काळेश्वरीदेवी मंदिरासमोर व परिसरात उघड्यावर अंधश्रद्धेपोटी केली जाणारी हजारो कोंबड्या - बकर्‍यांची पशुहत्या त्वरित थांबवावी, अशी मागणी सातारा जिल्हा अंनिसने जिल्हाधिकारी व जिल्हा पोलीस प्रमुखांकडे ऑनलाईन निवेदनाद्वारे केली आहे. 

निवेदनात म्हटले आहे, की संविधानाने देव आणि धर्म पालनाचे स्वातंत्र्य सर्व नागरिकांना दिले आहे. याचा अंधश्रद्धा निर्मूलन समिती आदर करते. परंतु, देव आणि धर्माच्या नावाने सार्वजनिक ठिकाणी करणी व जादूटोणा यांची भीती घालून पशुबळी करायला लावणे याला विरोध आहे. सातारा जिल्ह्यातील वाई तालुक्यांमध्ये मांढर गडावर मोठ्या प्रमाणावर पशुहत्या होत होती. तेथे घडलेल्या मोठ्या दुर्घटनेमुळे अनेकांचे जीव गेले होते.

बळी देण्याची जय्यत तयारी ?

सध्या कोरोना विषाणू प्रादुर्भावामुळे सर्वत्र यात्रा, जत्रा यांचेवर जिल्हाधिकारी यांनी निर्बंध आणले आहेत. या नियमांचे उघडपणे उल्लंघन करून कृष्णानगर (वनवासवाडी) येथील श्री काळेश्वरीदेवी मंदिर या ठिकाणी २२ फेब्रुवारी २०२१ रोजी गुप्तपणे मिटिंग घेवून दि. २ व ३ मार्च रोजी मोठी यात्रा घेण्याचे नियोजन केले आहे असे समजते. दि. ३ मार्च रोजी पहाटेपासून मोठ्या प्रमाणात बकरे व कोंबडी यांचे बळी श्री काळेश्वरीदेवी मंदिरासमोर व परिसरात दिले जाणार आहेत. यासाठी भक्तांना मोठ्या प्रमाणात जेवणावळी दिल्या जाणार आहेत. हे पशुबळी विधी करण्यासाठी सुरी, सत्तूर, विळे, लाकडी ठोकळे, भांडी यांची जय्यत तयारी मंदिरामागे असलेल्या 'तथास्तु' या बंगल्यात व परिसरात करण्यात आली आहे.

याप्रकरणी त्वरित लक्ष घालून पशुबळी रोखावेत. तसेच या यात्रेमुळे कोरोना संसर्ग वाढून होणारे नुकसान टाळावे. तसेच सबंधित खेड ग्रामपंचायत पदाधिकारी यांना योग्य सूचना देऊन, यात्रा आयोजक कमिटी व पशुबळीस प्रोत्साहन देणारे व्यक्ती यांच्यावर योग्य ती कठोर कारवाई करण्याची मागणी सातारा अंनिसने या निवेदनात केली आहे.

Get all live and latest Marathi news, Maharashtra news and all exclusive, top marathi news headlines from politics, sports, ententertainment, business, all events from satara, all cities of Maharashtra, India.

आजच्या ताज्या बातम्या  

पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता.

आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क - 7588638613 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या