Satara News : खंडाळ्यात दोन ते तीन वाहनांना एकच नंबरप्लेट


पोलिसांच्या चाणाक्षपणामुळे उघडकीस आला टेंपोमालकाचा झोल; कसून चौकशी

Satara News : खंडाळा पोलिसांनी एकच नंबरप्लेट दोन ते तीन व्यावसायिक वाहनांस वापरुन टॅक्स वाचविण्यासाठी काळा धंदा करणाNया टेम्पोच्या मालकाचा पर्दाफाश करुन कर बुडविणाNयाला चपराक दिली आहे. या घटनेवरुन चालक अभिषेक अंकुश गुडगुडे (रा. राजापूर, ता. भोर) यास कागदपत्रे जमा करण्याची नोटीस देऊन गाडी ताब्यात घेण्यात आली. पुढील कारवाईसाठी उपप्रादेशिक कार्यालयाकडे पाठविण्यात आले. 

खंडाळा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक महेश इंगळे यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक एस. बी. क्षीरसागर, पोलीस कर्मचारी गिरीश भोईटे व कर्मचारी विनामास्क फिरणाNयांवर कारवाई करत असताना टेम्पो चालकास गाडीची मूळ विंâवा ऑनलाइन कागदपत्रे मागितली असता चालकाने कागदपत्रे नसल्याचे कबूल केले. 

या गाडीची तपासणी केली असता चासी व इंजिन नंबर हे गाडी क्रमांकाशी जुळत नसल्याचे आढळले. यावर चालकाने दोन, तीन गाड्यांना एकच नंबरप्लेट असल्याचे सांगितले. यावर गाडीमालक नवनाथ महादेव साळुंखे (रा. सावदरे, ता. भोर) यांचीही चौकशी करण्यात आली.

Get all live and latest Marathi news, Maharashtra news and all exclusive, top marathi news headlines from politics, sports, ententertainment, business, all events from satara, all cities of Maharashtra, India.

आजच्या ताज्या बातम्या  

पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता.

आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क - 7588638613

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या