Satara News : जेईई मध्ये दिशा अ‍ॅकॅडमीने फडकवली विजयी पताका


नऊ विद्यार्थी ९० टक्क्यांपुढे, तर २९ विद्यार्थी ८० टक्केहून अधिक गुणांसह यशस्वी

Satara News : आयआयटी आणि एनआयटी अभियांत्रिकी महाविद्यालयांमध्ये प्रवेश घेण्यासाठी प्रवेश परीक्षा समजली जाणारी जेईई मेन परीक्षा २३ ते २६ फेब्रुवारी २०२१ या काळात घेण्यात आली. जेईई मेन परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून वाईतील दिशा अ‍ॅकॅडमीने यशाची परंपरा कायम राखत घवघवीत यश मिळवले आहे. ९ विद्यार्थ्यांना ९० पर्सेंटाइलपेक्षा, तर २९ विद्यार्थ्यांना ८० पर्सेंटाइलपेक्षा जास्त गुण मिळाले आहेत. 

दिशा अ‍ॅकॅडमीचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. नितीन कदम यांनी यश संपादन करणार्‍या विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे. जेईई परीक्षेचे शिवधनुष्य पेलण्यासाठी योग्य दिनक्रम, खेळ, व्यायाम, योग-प्राणायामाच्या मदतीने मन आणि शरीराचा समतोल राखणे आवश्यक असते. कारण जेईई परीक्षेत निगेटिव्ह मार्किंग असते. यात संकल्पनांवर आधारित प्रश्न विचारले जातात. केवळ संकल्पना समजून जेईई परीक्षा पास होता येत नाही. तर विद्यार्थ्यांमध्ये प्रश्न सोडवण्याची उच्च क्षमता विकसित होणे गरजेचे असते. शिकण्याच्या नवीन पद्धती, पेपर सोडविण्याच्या क्लृप्त्या आणि मुत्सद्दीपणा आत्मसात करणे गरजेचे आहे. म्हणूनच या परीक्षेचा अभ्यास अकरावीत असल्यापासून पुढील दोन वर्षे दहा ते बारा तास करावा लागतो, असे प्रतिपादन प्रा. डॉ. कदम यांनी यावेळी केले.

दिशा अ‍ॅकॅडमीकडून सर्वोत्तम तयारी

सीईटी, नीट, जेईई परीक्षेसाठी दिशा अ‍ॅकॅडमी सर्वोत्तम तयारी करून घेत असल्याने अनेक पालक व विद्यार्थी दिशाला प्राधान्यक्रम देत आहेत. दिशातील विद्यार्थ्यांनी मिळवलेल्या यशात विद्यार्थ्यांची चिकाटी, प्रयत्न यांचे योगदान १०० टक्के आहेच, शिवाय दिशाचे अ‍ॅकॅडमीक हेड रवी पुरोहित, प्रा. रोहित सिंह, प्रा. प्रवीण ब्रह्मे, प्रा. प्रदिपकुमार बारीक व रोशन झा आणि बॅच कोर्डिनेटर कल्याण इंगवले यांचाही मोलाचा वाटा आहे. दिशा परिवाराने यशस्वी विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीसाठी अनेक शुभेच्छा दिल्या आहेत.

Get all live and latest Marathi news, Maharashtra news and all exclusive, top marathi news headlines from politics, sports, ententertainment, business, all events from satara, all cities of Maharashtra, India.

आजच्या ताज्या बातम्या  

पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता.

आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क - 7588638613

टिप्पणी पोस्ट करा

1 टिप्पण्या